• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • केवळ 49 रुपये प्रतिदिन EMI वर घरी घेऊन या ही टू-व्हीलर, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

केवळ 49 रुपये प्रतिदिन EMI वर घरी घेऊन या ही टू-व्हीलर, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

तुम्ही जास्त मायलेज देणारी आणि स्वस्त टू-व्हीलर (Buy your own bike) खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्याकडे आता एक चांगली संधी आहे. TVS मोटर इंडिया (TVS Motor India) विविध गाड्यांवर धमाकेदार ऑफर घेऊन आले आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 18 जुलै: जीवनातील चेकलिस्टमध्ये अनेकांसाठी गाडी घेणं हे एक महत्त्वाचं स्वप्न असतं. टू-व्हीलर किंवा फोर-व्हीलर गाडीसाठी घेण्यासाठी प्रयत्न तर केलेच जातात. तुम्ही जास्त मायलेज देणारी आणि स्वस्त टू-व्हीलर (Buy your own bike) खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्याकडे आता एक चांगली संधी आहे.  TVS मोटर इंडिया (TVS Motor India) विविध गाड्यांवर धमाकेदार ऑफर घेऊन आले आहेत. कंपनीकडून त्यांच्या TVS XL 100 या टू-व्हीलरवर जबरदस्त ऑफर दिली जात आहे. ही टू-व्हीलर तुम्ही केवळ 49 रुपये प्रतिदिनच्या EMI वर घरी घेऊन जाऊ शकता. याशिवायही तुम्हाला काही ऑफर्स मिळतील. TVS XL 100 चे फीचर्स कंपनीकडून असा दावा केला जात आहे की ही टू-व्हीलर इतर वाहनांपेक्षा 15 टक्के जास्त मायलेज देते. याशिवाय यामध्ये टीव्हीएसने एक ऑन-ऑफ स्विच देखील दिला आहे. यामध्ये मोबाइल चार्जिंगचा देखील पर्याय आहे. ही टू-व्हीलर ड्यूअल टोन कलरमध्ये उपलब्ध आहे. हे वाचा-जागो ग्राहक जागो! Ola-Uber ड्रायव्हर्सने राईड कॅन्सल केली तर अशी करा तक्रार TVS XL 100 वर खास ऑफर ही टू-व्हीलर तुम्ही केवळ 49 रुपये प्रतिदिनच्या EMI वर खरेदी करू शकता. शिवाय तुम्ही पेटीएमवरून पेमेंट केले तर तुम्हाला 4,500 रुपयांपर्यंत कॅशबॅकही मिळेल. कंपनीच्या नवीन EMI स्कीम अंतर्त ग्राहकांना टीव्हीएस एक्सएल 100 खरेदी केल्यानंतर दरमहा 1470 रुपये द्यावे लागतील. दर दिवसाच्या हिशोबाने ग्राहकांना 49 रुपये द्यावे लागतील. ही सर्वात स्वस्त ईएमआय स्कीम आहे. याशिवायही काही ऑफर उपलब्ध आहेत. उदा. ग्राहक 7999 रुपयांचं डाउन पेमेंट करूनही ही टू-व्हीलर घरी घेऊन जाऊ शकतो. हे वाचा-E-Ticket बुकिंगसाठी IRCTC एजेंट होण्याची संधी, महिन्याला होईल 80000 कमाई TVS XL 100 चे इंजिन या दुचाकीमध्ये टीव्हीएसने 100cc चे सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. जे 4.3 bhp ची पॉवर आणि 6.5 Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. या टू-व्हीलरची किंमत 49,999 रुपये आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: