नवी दिल्ली, 28 मे: एलआयसी पॉलिसीधारकांसाठी आणि नवीन एलआयसी पॉलिसी (LIC Policy) काढू इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर LIC पॉलिसी काढली असेल तर किंवा काढणार असाल तर सावधान! कारण कोरोनाकाळात (Coronavirus) फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. बँक ग्राहकांच्या फसवणुकीच्या घटना नेहमी समोर येतात, आता LIC ग्राहकांना देखील लक्ष्य केलं जात आहे. हे फसवणूक करणारे भामटे एलआयसी अधिकारी किंवा IRDAI अधिकारी बनून ग्राहकांना फोन करतात आणि त्याचं खातं रिकामं करतात. ही प्रकरणं पाहता देशातील सर्वात मोठ्या इन्शुरन्स कंपनीने (LIC-Life Insurance Corporation of India) ग्राहकांना अलर्ट पाठवला आहे.
ट्वीट करून LIC ने केलं अलर्ट
काही भामटे LIC अधिकारी, एजंट (Fake LIC Agent or officer) किंवा विमा नियामक आयआरडीएचे अधिकारी बनतात आणि ग्राहकांना कॉल करतात. यांच्या जाळ्यात अडकल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. एलआयसीने जारी केलेल्या अलर्टमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, कंपनी कोणतीही पॉलिसी सरेंडर करण्याबाबत ग्राहकांना सूचवत नाही.
हे वाचा-Gold- Silver Price Today: चांदीचे भाव गडगडले तर सोनं महागलं, इथे तपासा आजचे दर
बनावट कॉल्सपासून राहा सावधान
कंपनीने ग्राहकांना या अशाप्रकारच्या नंबरवरून आलेले फोन अटेंड न करण्याचे आवाहन केले नाही. एलआयसीने ग्राहकांना सूचित केले आहे की त्यांनी एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर त्यांची पॉलिसी रजिस्टर करावी आणि त्याठिकाणी सर्व माहिती घ्यावी.
— LIC India Forever (@LICIndiaForever) May 27, 2021
हे लक्षात ठेवा
- तुम्हाला जर पॉलिसीसंदर्भात कोणती माहिती हवी असेल तर एलआयसीची अधिकृत वेबसाइट www.licindia.in ला भेट द्या आणि माहिती मिळवा. कोणत्याही क्रमांकावर फोन करून पॉलिसीसंदर्भात माहिती मिळवू नका
-बनावट कॉल आल्यास तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करू शकता, शिवाय spuriouscalls@licindia.com यावर देखील तुमची तक्रार नोंदवू शकता.
-अशाच एजंटकडून पॉलिसी खरेदी करा ज्याच्याकडे आयआरडीए द्वारे जारी करण्यात आलेला परवाना आहे किंवा एलआयसीने दिलेले ओळखपत्र (ID) आहे
हे वाचा-आता SBI च्या Debit Card वरही मिळते EMI ची सुविधा, पाहा कसा होईल फायदा
-जर तुम्हाला कोणताही दिशाभूल करणारा कॉल आला तर co_crm_fb@licindia यावर इमेल करून तक्रार करू शकता.
-एलआयसीच्या वेबसाइटवर जाऊन तक्रार निवारण अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा पर्याय ग्राहकांकडे आहे.
-तुमची वैयक्तिक आणि पॉलिसीसंदर्भातील माहिती इतर कुणाकडेही शेअर करू नका
-पॉलिसी सरेंडर करण्यासंदर्भातही कुणाला माहिती देऊ नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, LIC