नवी दिल्ली, 25 मे : आजकाल EMI चा मोठा वापर केला जातो. याचे अनेक फायदे आहेत. पहिलं तर एक रकमी रक्कम खर्च होत नाही, अनेकदा यावर पेमेंट इंटरेस्टही लागत नाही. परंतु ईएमआयची सुविधा साधारणपणे क्रेडिट कार्डवर दिली जाते आणि सर्वांकडेच क्रेडिट कार्ड नसतं. अशात देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (Sate Bank of India) डेबिट कार्डवर EMI ची सुविधा देत आहे.
SBI ने दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या Debit Card ने तुम्ही टीव्ही, फ्रिज, AC सारखे होम अप्लायंसेज खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन शॉपिंग केल्यासही आता EMI चा पर्याय मिळेल. तुम्ही एखाद्या दुकानात POS मशीनने पेमेंट केल्यानंतर ती रक्कम अनेक हप्त्यामध्ये फेडता येते. यामुळे तुमच्या खात्यातून मोठी रक्कम एकदाच कट होत नाही. तुम्ही तुमच्या सुविधेनुसार, EMI ची संख्या निवडू शकता.
जर Amazon, Flipkart वरुनही ऑनलाईन शॉपिंग करत असाल, तरीही एसबीआय डेबिट कार्डने पेमेंट करुन, ते EMI मध्ये कन्हर्ट करू शकता.
SBI ची ही ऑफर कोणासाठी?
SBI ने दिलेल्या माहितीनुसार, ही सुविधा प्री-अप्रुव्ड बेस्ड आहे. म्हणजेच SBI च्या सर्वच ग्राहकांना हे सुविधा मिळत नाही. काही निवडक ग्राहकांनाच डेबिट कार्डमधून EMI कन्व्हर्जनची ऑफर मिळते. इतर ग्राहकांना डेबिट कार्डने नेहमीप्रमाणे पेमेंट करावं लागेल. त्यामुळे शॉपिंग करण्याआधी तुमच्या डेबिट कार्डवर EMI ची सुविधा आहे की नाही ते तपासा आणि त्यानंतरच शॉपिंग करा.
EMI ची सुविधा आहे की नाही कसं समजेल?
तुमच्या डेबिट कार्डवर EMI ची सुविधा आहे की नाही हे तपासण्यासाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल फोन नंबरवरुन 567676 वर DCEMI लिहून मेसेज पाठवा. त्यानंतर तुमच्या डेबिट कार्डवर EMI सुविधा आहे की नाही ते समजेल.
SBI डेबिट कार्डच्या EMI चे फायदे -
जर तुमच्या SBI डेबिट कार्डवर EMI ची सुविधा असेल, तर तुम्ही 1 लाखांपर्यंतची शॉपिंग करू शकता. त्यानंतर त्याचं पेमेंट करण्यासाठी तुम्हाला 6, 9, 12 आणि 18 महिन्यांचा EMI ऑप्शन मिळतो. तुम्ही तुमच्या सुविधेनुसार कोणताही ऑप्शन निवडू शकता.
EMI वर 2 वर्षांच्या MCLR वर 7.5 टक्के अधिक व्याज घेतलं जाईल. परंतु, बँकेने स्पष्ट केलं आहे, की अधिकतर उत्पादनांवर No Cost EMI ऑफर असते, म्हणजेच अनेक वस्तूंच्या खरेदीवर व्याज द्यावं लागणार नाही. ग्राहकांना या सुविधेसाठी कोणतीही प्रोसेसिंग फी द्यावी लागणार नाही. तसंच हे प्री-अप्रुव्ड असल्याने यासाठी कोणत्याही पेपर वर्कची गरज लागत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: SBI, SBI Bank News