मराठी बातम्या /बातम्या /मनी /

आता 'महाराजा'वर असणार TATA चा हक्क? Air India च्या विक्रीबाबत सरकार उद्या करणार घोषणा

आता 'महाराजा'वर असणार TATA चा हक्क? Air India च्या विक्रीबाबत सरकार उद्या करणार घोषणा

Air India Sale: कर्जबाजारी एअर इंडियाची बोली कोण जिंकलं आहे याची घोषणा केंद्र सरकार शुक्रवारी करू शकते. एअर इंडिया पुन्हा आपल्या जुन्या मालक टाटा समूहाकडे जाऊ शकते अशी चर्चा आहे.

Air India Sale: कर्जबाजारी एअर इंडियाची बोली कोण जिंकलं आहे याची घोषणा केंद्र सरकार शुक्रवारी करू शकते. एअर इंडिया पुन्हा आपल्या जुन्या मालक टाटा समूहाकडे जाऊ शकते अशी चर्चा आहे.

Air India Sale: कर्जबाजारी एअर इंडियाची बोली कोण जिंकलं आहे याची घोषणा केंद्र सरकार शुक्रवारी करू शकते. एअर इंडिया पुन्हा आपल्या जुन्या मालक टाटा समूहाकडे जाऊ शकते अशी चर्चा आहे.

    नवी दिल्ली, 07 ऑक्टोबर: कर्जबाजारी झालेली सरकारी विमान कंपनी एअर इंडियाचे (Air India Sale) नेतृत्व कोण करणार, याचा खुलासा उद्या होण्याची शक्यता आहे. सीएनबीसी-टीव्ही 18 ने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, कर्जबाजारी एअर इंडियाची बोली कोण जिंकलं आहे याची घोषणा केंद्र सरकार शुक्रवारी करू शकते. एअर इंडिया पुन्हा आपल्या जुन्या मालक टाटा समूहाकडे जाऊ शकते अशी चर्चा आहे. एअर इंडियाची स्थापना टाटा समूहाने (Air India and Tata Sons) केली होती. ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेच्या (Bloomberg Report on Air India) अहवालानुसार, वर्षअखेपर्यंत महाराजा अर्थात एअर इंडियाची सूत्र टाटा सन्सच्या हातात जाऊ शकतात. दरम्यान सरकारने मीडिया अहवालात समोर आलेल्या या वृत्ताचे खंडन केले आहे. डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंट (DIPAM) ने असे म्हटले होते की, एअर इंडिया निर्गुंतवणुकीच्या प्रकरणात भारत सरकारने आर्थिक निविदांना मंजुरी दिल्याचे सांगणारे मीडिया रिपोर्ट चुकीचे आहेत. सरकार जेव्हा या प्रकरणी निर्णय घेईल तेव्हा माध्यमांना माहिती दिली जाईल. SBI Gold Deposit Scheme: घरातील ठेवलेल्या सोन्यातून करा कमाई, एसबीआय देतंय संधी एअर इंडिया ही एकमेव सरकारी मालकीची विमान कंपनी सध्या कर्जात बुडाली आहे. एअर इंडियाच्या डोक्यावर 58 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. याचा परिणाम म्हणून याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतनही वेळेवर मिळत नाही. 1932 मध्ये टाटांनी सुरू केली होती एअर इंडिया एअर इंडियाची सुरुवात टाटा समूहाने 1932 मध्ये केली होती. टाटा समूहाचे जेआरडी टाटा (JRD TATA Air India) हे त्याचे संस्थापक होते. त्यावेळी या कंपनीचे नावा टाटा एअरलाइन्स होते. जेआरडी स्वतः पायलट होते. तेव्हा या कंपनीचे ना टाटा एअर सर्विस असे होते. 1938 पर्यंत कंपनीने देशांतर्गत उड्डाणे सुरू केली होती. 1946 मध्ये या विमान कंपनीचे नाव एअर इंडिया करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धानंतर ती एक सरकारी कंपनी बनली. स्वातंत्र्यानंतर 1953 साली सरकारने या कंपनीतील 49% हिस्सा विकत घेतला. 2000 सालापर्यंत ही कंपनी फायद्यामध्ये होती. घटस्थापनेदिवशीच सोन्याची झळाळी उतरली, आज 9,300 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं सरकार का विकतेय एअर इंडिया? 2007 साली सरकारने एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सचे विलिनीकरण केले होते. या इंधनाचे वाढते दर, खासगी विमान कंपन्यांकडून असणारी तगडी स्पर्धा हे या मर्जरमागील कारण असल्याचे सरकारने म्हटले होते. दरम्यान 2000 ते 2006 या काळात एअर इंडियाला मिळणारा नफा कमीच झाला होता. मात्र मर्जरनंतर आणखी परिस्थिती बिकट झाली. कंपनीच्या डोक्यावरील कर्ज वाढत गेले. 31 मार्च 2019 पर्यंत कंपनीच्या डोक्यावर  60 हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज होतं.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Air india, Tata group

    पुढील बातम्या