मराठी बातम्या /बातम्या /मनी /

SBI Gold Deposit Scheme: घरातील ठेवलेल्या सोन्यातून करा कमाई, एसबीआय देतंय संधी

SBI Gold Deposit Scheme: घरातील ठेवलेल्या सोन्यातून करा कमाई, एसबीआय देतंय संधी

SBI Revamped Gold Deposit Scheme: अनेकदा घरामध्ये असणाऱ्या सोन्याच्या वापर केला जात नाही. ते लॉकरमध्ये पडून राहतं, दरम्यान याच सोन्यातून तुम्ही कमाई करू शकता.

SBI Revamped Gold Deposit Scheme: अनेकदा घरामध्ये असणाऱ्या सोन्याच्या वापर केला जात नाही. ते लॉकरमध्ये पडून राहतं, दरम्यान याच सोन्यातून तुम्ही कमाई करू शकता.

SBI Revamped Gold Deposit Scheme: अनेकदा घरामध्ये असणाऱ्या सोन्याच्या वापर केला जात नाही. ते लॉकरमध्ये पडून राहतं, दरम्यान याच सोन्यातून तुम्ही कमाई करू शकता.

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 07 ऑक्टोबर: अनेकदा घरामध्ये असणाऱ्या सोन्याच्या वापर केला जात नाही. ते लॉकरमध्ये पडून राहतं, दरम्यान याच सोन्यातून तुम्ही कमाई करू शकता. जर तुम्हाला सोन्यातून कमाई करायची असेल तर तुम्ही देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI (SBI Gold Scheme) मध्ये जमा करू शकता. एसबीआयची रिव्हॅम्पड गोल्ड डिपॉझिट योजना म्हणजेच आर-जीडीएस (SBI Revamped Gold Deposit Scheme) मुदत ठेवीप्रमाणे (Fixed Deposit) काम करते. या योजनेअंतर्गत ग्राहक त्यांचे सोने जमा करू शकतात आणि व्याजाच्या स्वरूपात रक्कम मिळवू शकतात. एसबीआयच्या वेबसाइटवर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. स्वतंत्र व्यक्तीप्रमाणे या योजनअंतर्गत प्रोपराइटर आणि पार्टनरश‍िप फर्म, एचयूएफ (हिंदू अविभाजित परिवार), सेबीमध्ये रजिस्‍टर्ड म्युच्युअल फंड/ एक्सचेंज-ट्रेडेड फंड आणि कंपन्या, धर्मार्थ संस्थान किंवा सेंट्रल आणि स्‍टेट गव्हर्नमेंटच्या मालकी हक्काखालील यूनिट्स देखील यामध्ये गुंतवणूक करू शकतात. तुम्हाला आलाय हा SMS किंवा ईमेल तर वेळीच व्हा सावध! बुडेल तुमच्या कष्टाची कमाई किती जमा करता येईल सोनं? कमीतकमी 10 ग्रॅम कच्चे सोने (बार, नाणी, दागिने, विशिष्ट खडे आणि धातू वगळता) या योजनेत जमा करता येईल. शिवाय जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही आहे. गुंतवणूक करण्याचे आहेत तीन पर्याय शॉर्ट टर्म बँक डिपॉझिट (STBD)- कालावधी 1 ते 3 वर्ष मीडियम टर्म गव्हर्नमेंट डिपॉझिट (MTGD)- कालावधी 5-7 वर्ष लॉन्ग टर्म गव्हर्नमेंट डिपॉझिट (LTGD)- कालावधी 12-15 वर्ष किती मिळेल व्याज? >>STBD वरील व्याज एका वर्षासाठी-  0.50 टक्के प्रति वर्ष 1 वर्षापेक्षा जास्त ते दोन वर्षापर्यंत- 0.55 टक्के प्रति वर्ष 2 वर्षापेक्षा जास्त ते तीन वर्षापर्यंत- 0.60 टक्के प्रति वर्ष रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी! 78 दिवसांच्या पगाराइतका मिळणार बोनस >>MTBD वरील व्याज- 2.25 टक्के प्रति वर्ष >>LTGD वरील व्याज- 2.50 टक्के प्रति वर्ष काय आहे रिपेमेंटची प्रक्रिया? एसटीबीडी: तुम्हाला या सोन्यासाठीची रक्कम एकतर सोन्याच्या स्वरुपात किंवा मॅच्युरिटीच्या तारखेला असणाऱ्या समकक्ष किंमतीमध्ये घेण्याचा पर्याय मिळेल. MTGD आणि LTGD: ठेवीची पूर्तता सोन्यामध्ये किंवा सध्याच्या प्रचलित किमतीनुसार सोन्याच्या मुल्याएवढ्या किंमतीत असेल. तथापि, गोल्ड रिडम्पशन झाल्यास 0.20% प्रशासकीय शुल्क आकारले जाईल.
First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, SBI

पुढील बातम्या