मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Rate Today: घटस्थापनेदिवशीच सोन्याची झळाळी उतरली, आज 9,300 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं

Gold Rate Today: घटस्थापनेदिवशीच सोन्याची झळाळी उतरली, आज 9,300 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं

Gold price today: नवरात्रौत्सवाच्या शुभमुहूर्तावर जर तुम्ही सोनंखरेदीचा प्लान करत असाल, तर आताच तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

Gold price today: नवरात्रौत्सवाच्या शुभमुहूर्तावर जर तुम्ही सोनंखरेदीचा प्लान करत असाल, तर आताच तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

Gold price today: नवरात्रौत्सवाच्या शुभमुहूर्तावर जर तुम्ही सोनंखरेदीचा प्लान करत असाल, तर आताच तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

    नवी दिल्ली, 07 ऑक्टोबर: भारतातील एका सर्वात महत्त्वाच्या सणाला आजपासून सुरुवात झाली आहे. हा सण म्हणजे नवरात्रौत्सव (Gold Price Navratri 2021). या शुभप्रसंगी आपल्या देशात सोनंखरेदीला विशेष महत्त्व आहे.  त्यामुळे जर तुम्ही सोनंखरेदीचा प्लान (Planning to buy Gold) करत असाल, तर आताच तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज घटस्थापनेच्या (Gold Price Today on 07th October 2021) दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचा लेटेस्ट भाव मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Gold Price on MCX) सोन्याची वायदे किंमत (Gold price today) 0.17% नी अर्थात 82 रुपयांनी कमी झाली आहे. आज सोन्याचा भाव  46,825 रुपये प्रति तोळावर ट्रेड करत आहे. सोन्याच्या किमती गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यातील उच्चांकी स्तरापासून सुमारे, 9,300 कमी आहेत. ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होतं. चांदीचा लेटेस्ट भाव चांदीच्या दरात (silver price today) 0.06 टक्क्यांनी अर्थात 37 रुपयांची किरकोळ घसरण झाली आहे. या घसरणीनंतर चांदीचे दर 61, 040 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. SIP सुरु करण्याचा विचार करताय? मग कधीच करू नका 'या' चुका; अन्यथा... देशातील महत्त्वाच्या शहरातील सोन्याचे दर गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, भारतात गुरुवारी सोने (24 कॅरेट) 46,680 रुपये प्रति तोळा दराने विकले जात आहे. चांदीची कालच्या किमतीपेक्षा 100 रुपयांच्या वाढीसह 60,700 रुपये प्रति किलोने विक्री होत आहे. नवी दिल्ली आणि मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे 45,750 रुपये आणि 45,680 रुपये प्रति तोळा आहे. वेबसाइटनुसार, या शुद्धतेच्या दर चेन्नईमध्ये 43,920 रुपये प्रति तोळा आहे.  24 कॅरेट सोन्याचा दर दिल्लीत 49,910 रुपये आणि मुंबईत 46,680 रुपये प्रति तोळा आहे. चेन्नईमध्ये आज सोने 47,910 रुपयांना विकले जात आहे. कोलकातासाठी किंमत 48,700 रुपये प्रति तोळा आहे. आधी शॉपिंग पेमेंट काही दिवसांनी! ऑनलाइन खरेदीत लोकप्रिय ठरतोय हा पर्याय मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver, Silver prices today

    पुढील बातम्या