मराठी बातम्या /बातम्या /मनी /PF withdrawal: कागदपत्र जमा केल्याशिवाय काढता येतील 1 लाख, वाचा कसा मिळेल या सुविधेचा फायदा

PF withdrawal: कागदपत्र जमा केल्याशिवाय काढता येतील 1 लाख, वाचा कसा मिळेल या सुविधेचा फायदा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) कर्मचाऱ्यांसाठी एक नवी सुविधा सुरू केली आहे. याच्या मदतीने कर्मचारी कोणतीही कागदपत्रं जमा केल्याशिवाय आपल्या खात्यातून एक लाख रुपयांपर्यंतची (PF money without documents) रक्कम काढू शकतात. जाणून घ्या काय आहे ही सुविधा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) कर्मचाऱ्यांसाठी एक नवी सुविधा सुरू केली आहे. याच्या मदतीने कर्मचारी कोणतीही कागदपत्रं जमा केल्याशिवाय आपल्या खात्यातून एक लाख रुपयांपर्यंतची (PF money without documents) रक्कम काढू शकतात. जाणून घ्या काय आहे ही सुविधा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) कर्मचाऱ्यांसाठी एक नवी सुविधा सुरू केली आहे. याच्या मदतीने कर्मचारी कोणतीही कागदपत्रं जमा केल्याशिवाय आपल्या खात्यातून एक लाख रुपयांपर्यंतची (PF money without documents) रक्कम काढू शकतात. जाणून घ्या काय आहे ही सुविधा

पुढे वाचा ...

    नवी दिल्ली, 06 ऑगस्ट: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) कर्मचाऱ्यांसाठी एक नवी सुविधा सुरू केली आहे. याच्या मदतीने कर्मचारी कोणतीही कागदपत्रं जमा केल्याशिवाय आपल्या खात्यातून एक लाख रुपयांपर्यंतची (PF money without documents) रक्कम काढू शकतात. ‘मेडिकल ॲडव्हान्स क्लेम’ (Medical Advance Claim) अंतर्गत ही सुविधा देण्यात येत आहे. ऑफिस मेमोरेंडम जारी करत ईपीएफओने याबाबत माहिती दिली आहे. एखादा गंभीर आजार झाल्यास कर्मचाऱ्याला जर रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली, तर या सुविधेमार्फत त्याच्या खात्यामधून एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम (Advance claim from PF account) काढता येऊ शकते.

    दुसऱ्याच दिवशी मिळतील पैसे

    मेडिकल ॲडव्हान्स क्लेम करणारा कर्मचारी सरकारी किंवा पब्लिक सेक्टर युनिट किंवा सीजीएचएस पॅनलची मान्यता असलेल्या रुग्णालयात दाखल असावा. जर या व्यक्तीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले असेल, तर याबाबत ईपीएफओमार्फत (EPFO Medical Advance Claim) तपासणी करण्यात येईल. या तपासणीनंतरच मेडिक्लेमसाठी अर्ज (PF Mediclaim form) भरण्याची परवानगी मिळेल. तुम्ही ज्या दिवशी अर्ज केला तो वर्किंग डे असेल, तर दुसऱ्याच दिवशी पैसे ट्रान्सफर केले जातील. हे पैसे तुमच्या खात्यावर किंवा मग थेट रुग्णालयाला ट्रान्सफर करण्यात येतील. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर 45 दिवसांच्या आत मेडिकल स्लिप जमा करणे आवश्यक आहे. तुमचं एकूण बिल हे ॲडव्हान्स रकमेसोबत ॲडजेस्ट केलं जातं.

    हे वाचा-तुम्ही चेकने पेमेंट करता का? RBI ने आणला हा नवा नियम,अन्यथा भरावा लागेल दंड

    ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर (www.epfindia.gov.in) जाऊन तुम्ही हा मेडिकल ॲडव्हान्स क्लेम करु शकता. तसंच, युनिफाईड पोर्टल मेम (unifiedportalmem.epfindia.gov.in) या वेबसाईटवरुनही तुम्ही हा क्लेम करु शकता. या वेबसाईट्सवर गेल्यानंतर तुम्हाला यासाठीचा अर्ज (फॉर्म-31, 19, 10 सी आणि 10 डी) भरावे लागतील. यानंतर तुमच्या बँक खाते नंबरचे शेवटचे चार अंक एंटर करुन व्हेरिफिकेशन करावं लागेल. यानंतर प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेम (Proceed for Online Claim) या पर्यायावर क्लिक करा.

    हे वाचा-मॅच्युरिटीआधी काढायचे आहेत SBI Fixed Deposit मधून पैसे? द्यावं लागेल एवढं शुल्क

    यानंतर येणाऱ्या पर्यायांमधून पीएफ ॲडव्हान्स (फॉर्म 31) हा पर्याय (PF Advance) निवडा. पुढे तुम्हाला पैसे काढण्यासाठीचे कारणही नमूद करावे लागेल. यानंतर तुम्हाला हवी असणारी रक्कम एंटर करुन, चेकची स्कॅन केलेली कॉपी अपलोड करावी लागेल. पुढे आपला पत्ता एंटर करा. यानंतर गेट आधार ओटीपी हा पर्याय निवडा. हा ओटीपी तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर येईल. हा ओटीपी एंटर केल्यानंतर तुमचा क्लेम फाईल होईल. अशा प्रकारे तुम्ही आपले डॉक्युमेंट्स जमा केल्याशिवायही पीएफ खात्यातून एक लाख (EPFO Advance claim) रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकता.

    First published:

    Tags: Epfo news, Pf, PF Amount, Pf news, PF Withdrawal