नवी दिल्ली, 22 जुलै : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटकाळात देशातील आर्थिक व्यवहार अत्यंत वाईट पद्धतीने प्रभावित झाले आहेत. त्यामुळे रोजगारावर अधिक परिणाम झाला आहे. मात्र सध्या यामध्ये सुधारणा होऊ लागली आहे. देशातील 21 सेक्टर्समधील 800 हून अधिक कंपन्यांवर नजर ठेवणारी स्टाफिंग फर्म टीमलीजच्या मते अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर रिक्रूटमेंट सेंटीमेंटमध्ये सुधारणा झाली आहे. कंपन्यांनी पुन्हा एकदा नोकऱ्या देण्याच्या प्रक्रियेस सुरुवात केली आहे.
एप्रिल ते सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीसाठी हायरिंग इंटेंट (Hiring Intent) 18 टक्के झाला आहे, जो मार्च ते जून या कालावधीमध्ये 11 टक्के होता. हायरिंग इंटेंट अशा कंपन्या किंवा एम्प्लॉयरची टक्केवारी आहे, जे ठराविक कालावधी दरम्यान नोकरभरती करतात. बेंगळुरूध्ये हायरिंग इंटेंट सर्वाधिक 21 टक्के आहे. दिल्लीमध्ये 19 टक्के, हैदराबादमध्ये 15 टक्के, चंदीगढमध्ये 15 टक्के तर कोलकाता आणि मुंबईमध्ये हा इंटेंट 12 टक्के आहे.
(हे वाचा-सोन्याचांदीच्या दरांनी गाठला उच्चांक! चांदी पहिल्यांदा 61 हजारांच्या वर)
इतर देशांपेक्षा भारतत नोकरभरतीची परिस्थिती चांगली
टीमलीजच्या अहवालानुसार इतर देशांपेक्षा भारतामध्ये हायरिंगची परिस्थिती चांगली आहे. कारण अमेरिकेमध्ये ही आकडेवारी 8 टक्के, युरोपमध्ये 9 टक्के आहे. मात्र कोरोनाच्या संकटाआधी ही आकडेवारी अधिक होती हेही तेवढेच सत्य आहे. सध्या देशाची अर्थव्यवस्था रुळावर येण्याचा प्रयत्न करत आहे. ऑक्टोबर 2019 ते मार्च 2020 पर्यंत देशातील हायरिंग इंटेंट 96 टक्के होता. टीमलीजच्या संस्थापक रितुपर्णा चर्कवर्ती यांनी अशी माहिती दिली की, जर मोठ्या शहरात लॉकडाऊन सुरू राहिला नाही तर या आर्थिक वर्षाच्या उर्वरित कालावधीमध्ये हायरिंग इंटेंट सातत्याने वाढू शकतो.
या क्षेत्रामध्ये नोकरीची संधी
-हेल्थकेअर अँड फार्मास्यूटिक्ल
-शिक्षण सुविधा
- ई-कॉमर्स
(हे वाचा-SBI ने सुरू केली खास सेवा! ATM मधून काढता येणार कितीही वेळा विनाशुल्क पैसे)
-टेक स्टार्टअप्स
-कृषि आणि एग्रो-केमिकल्स,
-आयटी आणि एफएमसीजी
या क्षेत्रांमध्ये नोकरभरतीच्या प्रक्रिया वेगाने होतील. या क्षेत्रात सर्व स्तरावर नोकरभरतीची शक्यता आहे. चक्रवर्ती यांच्या मते, आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाही मध्ये हायरिंग प्रक्रिया आणखी वेगात होईल.