• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • सोन्याचांदीच्या दरांनी गाठला उच्चांक! चांदी पहिल्यांदा 61 हजारांच्या वर; तर असे आहेत सोन्याचे दर

सोन्याचांदीच्या दरांनी गाठला उच्चांक! चांदी पहिल्यांदा 61 हजारांच्या वर; तर असे आहेत सोन्याचे दर

देशामध्ये सोन्याचांदीच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. बुधवारी आंतरराष्ट्री बाजारातील जोरदार उसळीमुळे भारतीय बाजारात चांदीची किंमत 61 हजार रुपये प्रति किलोग्रॅमपेक्षा जास्त जास्त झाली आहे

 • Share this:
  नवी दिल्ली, 22 जुलै : देशामध्ये सोन्याचांदीच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. बुधवारी आंतरराष्ट्री बाजारातील जोरदार उसळीमुळे भारतीय बाजारात चांदीची किंमत 61 हजार रुपये प्रति किलोग्रॅमपेक्षा जास्त जास्त झाली आहे. तर सोन्याच्या किंमती 50 हजार रुपये प्रति तोळा झाल्या आहेत. परिणाम सोन्याचांदीने आज उच्चांक गाठला आहे. बुधवारी भारतीय बाजारात 1 किलो चांदीची किंमत 61,200 रुपये आहे. गेल्या 7  वर्षातील चांदीची ही सर्वात जास्त किंमत आहे. चांदीच्या दरामध्ये 2020 मध्ये 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. कोरोना व्हायरसच्या संकटकाळात गुंतवणूकदारांनी त्यांच्या मोर्चा सेफ हेवन असेट्सकडे वळवला आहे. ज्यामुळे सोनेचांदीच्या किंमती सर्वोच्च स्तरावर पोहोचल्या आहेत. मल्टि कमोडिटीज एक्सचेंजवर (MCX) वर चांदीच्या सप्टेंबर महिन्यासाठीच्या किंमतीमध्ये बुधवारी 3208 अर्थात 5.59 टक्क्यांची वाढ झाली आहे. यानंतर या चांदीची किंमत 61,150 रुपये प्रति किलो वर ट्रेंड करत आहे. एमसीएक्सवर चांदी 58,000 रुपये दराने ट्रेंड करण्यास सुरूवात झाली त्यानंतर 61,200 रुपये प्रति किलोच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचली आहे. का वाढल्या चांदीच्या किंमती? एंजल ब्रोकिंग कमोडिटीचे डेप्यूटी व्हाइस प्रेसिडेंट अनुज गुप्ता यांच्या मते कोरोनाच्या संकटकाळात सुरक्षित पर्यायाकडे गुंतवणूकदारांनी मोर्चा वळवल्यामुळे सोन्याचांदीच्या किंमती वाढत आहेत. कोरोनामुळे खाणकामावर परिणाम झाला आणि पुरवठा खंडित झाला परिणामी चांदीच्या किंमतींमध्ये वाढ दिसून येत आहे. येत्या काही दिवसांत चांदीची किंमत प्रति किलो 62 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. (हे वाचा-SBI ने सुरू केली खास सेवा! ATM मधून काढता येणार कितीही वेळा विनाशुल्क पैसे) सोन्याच्या किंमतींनी ओलांडला पन्नास हजारांचा टप्पा एमसीएक्सवर प्रति तोळा सोन्याची किंमत 50,000 रुपयांच्या पुढे गेली आहे. बुधवारी एमसीएक्सवर सोन्याचा भाव 49,931 रुपयांनी ट्रेंड होण्यास सुरूवात झाली त्यानंतर सोन्याचे भाव 50,077 या सर्वोच्च स्तरावर पोहोचले आहेत. अनुज गुप्ता यांच्या मते, सोन्याच्या किंमतीत आणखी वाढ होईल. एका महिन्यात सोन्याची किंमत प्रति तोळा 51 हजार ते 52 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: