Home /News /money /

Gold Price Today: काल सादर झालेल्या बजेटनंतर आज सोने दरात घसरण, जाणून घ्या 10 ग्रॅमचा आजचा भाव

Gold Price Today: काल सादर झालेल्या बजेटनंतर आज सोने दरात घसरण, जाणून घ्या 10 ग्रॅमचा आजचा भाव

काल बजेट (Budget 2022-23) सादर झाल्याच्या एक दिवसानंतर आज 2 फेब्रुवारी रोजी सोने दरात (Gold Price Today) घसरण झाली आहे. चांदीचा दरही कमी झाला आहे.

    नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी: काल बजेट (Budget 2022-23) सादर झाल्याच्या एक दिवसानंतर आज 2 फेब्रुवारी रोजी सोने दरात (Gold Price Today) घसरण झाली आहे. चांदीचा दरही कमी झाला आहे. अशात सोनं खरेदीचा विचार करत असाल, तर चांगली संधी आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज एप्रिल डिलीव्हरी सोन्याचा भाव 0.25 टक्क्यांनी घसरला आहे. तर चांदीचा भाव (Silver price) 0.01 टक्क्यांनी कमी झाला आहे. सोने-चांदी भाव (Gold Silver Price) - एप्रिल डिलीव्हरी सोन्याचा भाव आज 0.25 टक्क्यांच्या घसरणीसह 47,792 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. आज चांदीमध्ये 0.01 टक्के घसरणीची नोंद झाली. आज एक किलो चांदीचा भाव 61,351 रुपये आहे. 2020 मध्ये याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर होता. आज MCX वर सोन्याचा डिसेंबर वायदे भाव 47,792 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सर्वोच्च स्तरावरुन सोनं अद्यापही 8400 रुपये स्वस्त मिळत आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

    हे वाचा - पासपोर्टमध्ये असणार 'चिप'; वाचा अर्थमंत्र्यांनी घोषणा केलेल्या E-Passport विषयी

    कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

    हे वाचा - लॉटरीच्या पैशांतून लागला जॅकपॉट, 37 हजार गुंतवून मिळवले 30 कोटी

    कोरोनाचा काळ अनेकांसाठी आर्थिक तंगीचा असला तरी या काळात सोन्याच्या दागिन्यांची (Gold Demand Hike in India) मागणी वाढली आहे. देशात मागणी वाढल्याने सोन्याची आयात वाढली आहे. चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक आहे. ज्वेलरी उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने सोने आयात केले जाते.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Budget, Finance, Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today, Money, Silver prices today

    पुढील बातम्या