मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

लॉटरीच्या पैशांतून लागला जॅकपॉट, 37 हजार गुंतवून मिळवले 30 कोटी

लॉटरीच्या पैशांतून लागला जॅकपॉट, 37 हजार गुंतवून मिळवले 30 कोटी

एका लॉटरीच्या पैशातून दुसरी लॉटरी आणि त्यातून कोट्यधीश झालेल्या अमेरिकी नागरिकाची सध्या जोरदार चर्चा आहे.

एका लॉटरीच्या पैशातून दुसरी लॉटरी आणि त्यातून कोट्यधीश झालेल्या अमेरिकी नागरिकाची सध्या जोरदार चर्चा आहे.

एका लॉटरीच्या पैशातून दुसरी लॉटरी आणि त्यातून कोट्यधीश झालेल्या अमेरिकी नागरिकाची सध्या जोरदार चर्चा आहे.

  • Published by:  desk news
मिशिगन, 1 फेब्रुवारी: एका लॉटरीच्या बक्षीसाची (Lottery) रक्कम (Amount) दुसऱ्या लॉटरीत गुंतवत (Another Lottery) कोट्यधीश (Billionaire) झालेल्या ज्येष्ठ नागरिकाची (Senior Citizens) सध्या अमेरिकेत जोरदार चर्चा सुरू आहे. अमेरिकेच्या मिशिगनमध्ये (Michigan) राहणाऱ्या एका व्यक्तीनं लॉटरीचं एक तिकीट घेतलं होतं. त्यातून त्याला पहिल्यांदा किरकोळ रकमेची लॉटरी लागली. आपलं नशीब पुन्हा एकदा आजमावून पाहू असा विचार करत त्याने लॉटरीतून मिळालेले काही पैसे गुंतवून लॉटरीचं आणखी एक तिकीट घेतलं आणि त्यानंतर मात्र त्याचं नशीब फळफळलं.  लॉटरीतून लॉटरी मिशिगनमधील 74 वर्षे वयाच्या व्यक्तीनं लॉटरीचं एक तिकीट खरेदी केलं होतं. त्या तिकीटावर त्याला 500 अमेरिकन डॉलर म्हणजे साधारण 37 हजार रुपये मिळाले. हे पैसे खर्च करण्याऐवजी पुन्हा एकदा आपल्या नशीबाची परीक्षा घ्यावी, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यांनी लॉटरीतून मिळालेले पैसे खर्च करून जवळपास 150 मिलियन डॉलरची लॉटरीची तिकीटं खरेदी केली.  लॉटरीने केले मालामाल लॉटरीच्या तिकीटांपैकी पहिल्या तिकीटावर त्यांना 100 डॉलर मिळाले. त्यानंतर मधल्या काही तिकीटांनी त्यांना निराश केलं. आता लॉटरीचं अखेरचं तिकीट उरलं होतं. या तिकीटानं त्यांचं नशीबच बदलून टाकलं. या तिकीटावर त्यांना 40 लाख डॉलरची लॉटरी लागली. लॉटरीच्या या सीरिजमधलं हे पहिलं बक्षीस होतं. भारतीय चलनात विचार केला तर त्यांना तब्बल 30 कोटी रुपयांचं घबाड हाती लागलं.  हे वाचा - लॉटरीचा होता विश्वास शेवटचं तिकीट स्क्रॅच करताना आपल्याला भलंमोठं बक्षीस लागणार, याचा मनातून विश्वास वाटतच होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मात्र तरीही हा आपल्यासाठी आश्चर्याचा मोठा धक्का असून अद्यापही त्यावर विश्वास बसत नसल्याचं लॉटरीच्या विजेत्यांनी म्हटलं आहे. जेव्हा आपल्या बँक खात्यात ही रक्कम जमा होईल, तेव्हाच आपण यावर विश्वास ठेऊ शकू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 
First published:

Tags: America, Lottery, Money

पुढील बातम्या