Home /News /money /

कमाईची नवी संधी! जानेवारी अखेरीस येऊ शकतो Adani Wilmar IPO, वाचा सविस्तर

कमाईची नवी संधी! जानेवारी अखेरीस येऊ शकतो Adani Wilmar IPO, वाचा सविस्तर

अदानी विल्मर लिमिटेड (Adani Wilmar Ltd IPO) देखील आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. दरम्यान यासंबंधित सूत्रांच्या माहितीनुसार कंपनीने आयपीओची साइझ घटवली आहे. कंपनीने आयपीओची साइझ 4,500 कोटीवरुन कमी करत 3,600 कोटी केली आहे.

    मुंबई, 15 जानेवारी: देशातील आयपीओ मार्केट सध्या (Upcoming IPO List) सध्या तेजीत आहे. मोठमोठ्या कंपन्यांचे आयपीओ बाजारात दाखल झाले आहेत तर काही आयपीओ काहीच दिवसात येणार आहेत. दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या अदानी ग्रुपची कंपनी, अदानी विल्मर लिमिटेड (Adani Wilmar Ltd IPO) देखील आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. दरम्यान यासंबंधित सूत्रांच्या माहितीनुसार कंपनीने आयपीओची साइझ घटवली आहे. कंपनीने आयपीओची साइझ 4,500 कोटीवरुन कमी करत 3,600 कोटी केली आहे. सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की, अदानी विल्मार लिमिटेड या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच जानेवारीपर्यंत आयपीओ आणण्याचा विचार करत आहे. अदानी विल्मर खाद्यतेल ब्रँड फॉर्च्यून (फॉर्च्यून) हे प्रोडक्ट तयार करते. ही कंपनी अहमदाबादस्थित अदानी समूह आणि सिंगापूरस्थित विल्मर समूहाची संयुक्त उद्योग कंपनी आहे. या कंपनीमध्ये दोन्ही उद्योग दिग्गजांची 50:50 भागीदारी आहे. हे वाचा-गुंतवणूकदारांची 'या' शेअरमुळे लॉटरी, वर्षभरात 1 लाखांची गुंतवणूक बनली 23 लाख 3,600 कोटी रुपयांचा नवीन इश्यू कंपनीने यापूर्वी आयपीओसाठी दाखल केलेल्या दस्तऐवजानुसार त्यांची 4,500 कोटी रुपयांचा आयपीओ आणण्याची योजना होती. मात्र आता कंपनीच्या आयपीओची साइझ 3,600 कोटी रुपये करण्यात आली आहे. या IPO अंतर्गत संपूर्ण 3,600 कोटी रुपयांचे नवीन इश्यू जारी केले जातील आणि यामध्ये ऑफर फॉल सेल म्हणजेच OFS नसणार आहे. हे वाचा-या आठवड्यात 'छप्परफाड' रिटर्न! या TOP5 स्टॉकनी दिला 50% पेक्षा जास्त परतावा आयपीओच्या रकमेचा काय होणार वापर? IPO तून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी 1,900 कोटी रुपये भांडवली खर्चासाठी आणि 1,100 कोटी रुपये कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरले जातील. त्याचप्रमाणे 500 ​​कोटी रुपये धोरणात्मक संपादन आणि गुंतवणुकीवर खर्च केले जातील.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या