मराठी बातम्या /बातम्या /मनी /

या आठवड्यात 'छप्परफाड' रिटर्न देणारे शेअर्स; एकाने 90% तर बाकी Stock नी दिला 50% पेक्षा जास्त परतावा

या आठवड्यात 'छप्परफाड' रिटर्न देणारे शेअर्स; एकाने 90% तर बाकी Stock नी दिला 50% पेक्षा जास्त परतावा

या आठवड्यात, शेअर बाजारातील टॉप पाच शेअर्सनी (Top 5 Penny stocks this week) तब्बल 50 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिले आहेत. यातील एक शेअर मल्टिबॅगर (Multibagger stock this week) ठरला असून, त्याने तर आपल्या गुंतवणूकदारांना 90 टक्क्यांहून अधिक परतावा दिला.

पुढे वाचा ...

मुंबई, 15 जानेवारी: 10 जानेवारीपासून सुरू झालेल्या या आठवड्यात, शेअर बाजारातील टॉप पाच शेअर्सनी (Top 5 Penny stocks this week) तब्बल 50 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिले आहेत. यातील एक शेअर मल्टिबॅगर (Multibagger stock this week) ठरला असून, त्याने तर आपल्या गुंतवणूकदारांना 90 टक्क्यांहून अधिक परतावा दिला. शुक्रवारी (14 जानेवारी 22) शेअर बाजार बंद होताना, आठवडाभरात एकूण 9 शेअर्सनी 50 टक्क्यांहून अधिक रिटर्न (Top shares this week) नोंदवला. पाहूयात या आठवड्यातील टॉप पाच शेअर्स, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांची चांदी केली!

आरटीसीएल लिमिटेड – 91.43%

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये ट्रेड होणाऱ्या ग्रुप एक्समधील या शेअरने (RTCL Ltd. share price) या आठवड्यात तब्बल 91.43 टक्के रिटर्न दिला आहे. परतावा देण्यात (RTCL Ltd. returns) हा शेअर या आठवड्यात अव्वल राहिला. गेल्या आठवड्यात (3 ते 7 जानेवारी 22) हा शेअर 11.44 रुपयांवर बंद झाला होता. या आठवड्यात हा शेअर 21.90 रुपयांवर बंद झाला आहे. म्हणजेच, सात तारखेच्या शुक्रवारी जर कोणी या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर 14 तारखेला त्याचे एक लाख 91 हजार रुपये झाले असते.

हे वाचा-मार्केटमध्ये तेजी असताना स्टॉकची खरेदी करावी की विक्री?वाचा Howard Marksचा सल्ला

दौलत सिक्युरिटीज लिमिटेड – 67.2%

दौलत सिक्युरिटीज लिमिटेडच्या (Daulat Securities Ltd. share price) शेअरने या आठवड्यात 67.20 टक्के रिर्टर्न दिला आहे. सात जानेवारीला बंद होताना हा शेअर 24.85 रुपयांवर होता. तर, 14 जानेवारीला हा शेअर 41.55 रुपयांवर पोहोचला होता. म्हणजेच, गेल्या आठवड्यात या शेअरमध्ये गुंतवलेले एक लाख रुपये, या आठवड्यात एक लाख 67 हजार रुपये झाले असते.

साधना नायट्रो केमिकल्स लिमिटेड – 65.21%

साधना नायट्रो (Sadhana Nitro Chem Ltd. share price) हा शेअर सात जानेवारीला 67.4 रुपयांवर बंद झाला होता. या शुक्रवारी, म्हणजेच 14 जानेवारीला याची किंमत 111.35 रुपयांवर पोहोचली होती. म्हणजेच, या शेअरने आठडाभरात तब्बल 65.21 टक्के परतावा आपल्या गुंतवणूकदारांना दिला. जर एखाद्या गुंतवणूकदाराने गेल्या आठवड्यात या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते; तर त्याचे या आठवड्यात 1,65,000 रुपये झाले असते.

हे वाचा-Budget पूर्वी निखिल कामत यांचा सल्ला वाचाच, फायद्याची होईल शेअर्समधील गुंतवणूक

चॉईस इंटरनॅशनल लिमिटेड – 56.51%

सात जानेवारीला बंद होताना चॉईस इंटरनॅशनल (Choice International Ltd. share Price) या शेअरची किंमत 159.35 रुपये होती. तर या शुक्रवारी हा शेअर 249.4 रुपयांवर क्लोज झाला. म्हणजेच एका आठवड्यात य़ा शेअरने 56.51 टक्के परतावा दिला आहे. गेल्या आठवड्यात जर कोणी यात एक लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे या आठवड्यात एक लाख 56 हजार रुपये झाले असते.

वासवानी इंडस्ट्रीज लिमिटेड – 56.15%

वासवानी इंडस्ट्रीज लिमिटेड (Vaswani Industries Ltd.  Share Price) या स्टॉकनेही आठवड्याभरात 50 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिले आहेत. बीएसईच्या बी ग्रुपवर असणारा हा शेअऱ गेल्या आठवड्यात 18.7 रुपयांवर क्लोज झाला होता. या शुक्रवारी (14 जानेवारी 22) त्याची किंमत 69.2 रुपये होती. म्हणजेच, गेल्या आठवड्यात या शेअरमध्ये गुंतवलेले एक लाख रुपये, या आठवड्यात एक लाख 56 हजार रुपये झाले असते.

First published:

Tags: Share market