मुंबई, 15 जानेवारी : शेअर बाजार हा खरोखरच जोखमींनी भरलेला बाजार आहे. जाणकार सांगतात त्याप्रमाणे या बाजारात संयम राखला तर खरंच फायदा होतो आणि हे आपण रोज शेअर मार्केटमध्ये पाहत असतो. आता फक्त हा पेनी स्टॉक बघा. एके काळी कवडीमोल असलेला हा स्टॉक आज आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवत आहे. जीआरएम ओव्हरसीज (GRM Overseas) असं या शेअरचं नाव आहे.
या स्मॉल-कॅप राईस मिलिंग कंपनीच्या शेअरची किंमत गेल्या एका वर्षात 34 रुपयांवरून 782.40 रुपयांपर्यंत वाढली आहे. या एका वर्षाच्या कालावधीत या शेअरने आपल्या भागधारकांना 2,171.78 टक्के परतावा दिला आहे. एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याला 23 लाख रुपये मिळाले असते.
Multibagger Stock : आठवडाभरात बंपर कमाई; 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना 90 ते 50 टक्के रिटर्न्स
GRM ओव्हरसीज स्टॉक हिस्ट्री
10 वर्षांत, GRM ओव्हरसीजचा स्टॉक 1.93 वरून 782.40 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत या शेअरने आपल्या भागधारकांना सुमारे 40,450 टक्के परतावा दिला आहे. गेल्या 5 वर्षांत, हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 4.49 रुपयांवरून 782.40 रुपयांपर्यंत वाढला आहे. या 5 वर्षांच्या कालावधीत हा स्टॉक सुमारे 17,325 टक्क्यांनी वाढला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला हा शेअर 856 रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता.
गेल्या 6 महिन्यांची वाटचाल पाहिली तर हा मल्टीबॅगर स्टॉक 156 रुपयांवरून 782 च्या पातळीवर गेला आहे. या कालावधीत GRM ओव्हरसीजच्या स्टॉकची किंमत 400 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या एका महिन्यात या स्टॉकमध्ये 55 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 15 डिसेंबर रोजी शेअर 504 रुपयांवर होता, जो 277 रुपयांच्या वाढीसह 782 वर व्यवहार करत आहे.
गुंतवणूकदारांना किती नफा झाला?
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी या पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 1 लाख रुपये 5 लाख झाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने महिनाभरापूर्वी या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते, तर आज त्याचे 1 लाख रुपये 1.55 लाख रुपये झाले असते. आणि जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी हा स्टॉक 1.93 च्या पातळीवर विकत घेतला असेल आणि त्यात 1 लाख रुपये गुंतवले असतील तर तो आज 4.05 कोटी रुपयांचा मालक झाला असता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Share market