मुंबई, 09 सप्टेंबर : तुम्हाला तुमच्या आधार कार्डामध्ये पत्ता किंवा फोन नंबर बदलायचाय? मग पोस्ट ऑफिसमध्ये लांब रांग लावायची गरज नाही. आता UIDAI नं ऑनलाइन अपाॅइंटमेंट बुकिंग सुविधा सेंटर सुरू केलेत. तुम्ही आता सहजपणे अपाॅइंटमेंट घेऊ शकता. आधारसाठी अशी बुक करा ऑनलाइन अपाॅइंटमेंट UIDAI च्या वेबसाइटवर ज्या शहरात अपाॅइंटमेंट हवी, ते शहर निवडा. सध्या काही शहरांमध्ये 114 सेंटर्स आहेत. तिथे ही सुविधा मिळते. तर 53 शहरांमध्ये लवकरच ही सेवा सुरू होणार आहे. तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर द्यावा लागेल, त्यावर OTP पाठवला जाईल. तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि नाव भरावं लागेल. तुमची भाषा निवडावी लागेल. तारीख आणि वेळ निवडल्यानंतर तुम्हाला अपाॅइंटमेंट बुकिंग नंबर मिळेल. कार,बाइक चालवणाऱ्यांनो सावधान! वाहनांच्या इन्शुरन्समध्ये होतोय मोठा बदल आधार सेवा केंद्र हे पासपोर्ट सेवा केंद्राप्रमाणे काम करेल. UIDAI नं सांगितलंय की, अपाॅइंटमेंट हवी असणाऱ्यांना टोकन दिलं जाईल. टोकन दिल्यानंतर व्हेरिफिकेशन केलं जाईल. ते पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला फी भरण्यासाठी कॅश काउंटरवर जावं लागेल. आधार बनवणं मोफत आहे. पण त्यात बदल करायचा असेल तर 50 रुपये फी लागेल. नाव बदलणं - जर तुम्हाला आधार कार्डवरील आपलं नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, ई-मेल आणि बायोमॅट्रिक बदलायचे असल्यास यासाठी 50 रुपये मोजावे लागणार आहेत. ‘असे’ करा EPFचे पैसे NPS मध्ये ट्रान्सफर, होईल मोठा फायदा कलर प्रिंट आउट - eKYCच्या माध्यमातून आधार सर्च/फाइंड आधार/ किंवा अन्य बाबी आणि A4 साइज कलर प्रिंट आउट हवं असेल तर यासाठी 30 रुपये द्यावे लागतील. बायोमॅट्रिक अपडेट- तुम्हाला आपल्या मुलाचं आधार कार्डवरील त्याचं बायोमॅट्रिक अपडेट करायचं असल्यास यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क भरावं लागणार नाही. ही सुविधा अगदी मोफत आहे. SBI नं दिली ग्राहकांना खास भेट, आता ‘इतका’ कमी होणार तुमचा EMI आधार नोंदणी - आधार नोंदणीसाठीही तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. म्हणजे तुम्ही अगदी पहिल्यांदाच आधार कार्डसाठी नोंदणी करत असाल तर यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क तुमच्याकडून आकारले जात नाही. नोंदणी पूर्णतः मोफत आहे. इथे नोंदवा तक्रार - वरील बाबींऐवजी अन्य कोणत्याही गोष्टींसाठी तुमच्याकडून कोणीही पैशांची मागणी करत असेल तर याविरोधात अवश्य तक्रार नोंदवा. 1947 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी. शिवाय, help@uidai.gov.in या ई-मेल आयडीवरही तुम्ही आपली तक्रार पाठवू शकता. VIDEO: जमिनीच्या वादातून महिलांच्या दोन गटात दबंग स्टाईल हाणामारी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.