कार,बाइक चालवणाऱ्यांनो सावधान! वाहनांच्या इन्शुरन्समध्ये होतोय मोठा बदल

कार,बाइक चालवणाऱ्यांनो सावधान! वाहनांच्या इन्शुरन्समध्ये होतोय मोठा बदल

Motor Insurance - कार, बाइकच्या इन्शुरन्समध्ये बदल होणार आहे. त्यामागचं कारण हे आहे

  • Share this:

मुंबई, 09 सप्टेंबर : ट्रॅफिक नियम (Motor Vehicle Act 2019) तोडणाऱ्यांचं काही खरं नाही. एक तर सरकारनं भलाभक्कम दंड तर ठेवलाच आहे. पण याचा परिणाम तुमच्या कारच्या इन्शुरन्सवरही होणार आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा रहदारीचा नियम मोडाल, तेव्हा तेव्हा तुमच्या खात्यात पाॅइंट्स वाढले जातील. या पाॅइंट्सवरच तुमच्या कारची प्रीमियर किती महाग करायचा ते ठरेल. रस्त्यावरचे अपघात कमी करण्यासाठी मोदी सरकारनं ही पावलं उचललीयत.

या 9 सदस्यांच्या वर्कफोर्समध्ये ट्रॅफिक पोलीस, इरडा, इन्शुरन्स इन्फाॅर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया आणि खाजगी क्षेत्रातले अधिकारी यांचा समावेश आहे.

SBI नं दिली ग्राहकांना खास भेट, आता 'इतका' कमी होणार तुमचा EMI

हे सदस्य 2 महिन्यात सांगतील की ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन आणि इन्शुरन्स प्रीमियम यांना जोडण्याची काय पद्धत आहे.

सध्या कार इन्शुरन्स कार कुठली आहे यावर अवलंबून असतो.

कार मालकानं गेल्या वर्षाच्या इन्शुरन्सवर क्लेम केला नाही, तर दुसऱ्या वेळच्या प्रीमियममध्ये सवलत मिळते.

पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर, 'हे' आहेत आजचे दर

इरडाच्या 9 सदस्यांच्या समितीतले अधिकारी याबाबत लवकरच शिफारस देणार आहेत.

विमा कंपनींना प्रीमियम वाढवण्याचा फाॅर्म्युला लागू करण्यासाठी एनसीटी दिल्लीमध्ये पायलट प्रोजेक्ट सुरू करावा लागेल.

मोटार वाहन कायद्यानुसार आता 1 सप्टेंबरपासून वाहतुकीचे नियम मोडल्यास वाहनधारकांना जास्त दंड भरावा लागणार आहे. सुरक्षित वाहतुक व्यवस्था राखण्यासाठी दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. नव्या कायद्यातील तरतुदी लागू करण्याची अधिसूचना केंद्र सरकारने काढली आहे.

'असे' करा EPFचे पैसे NPS मध्ये ट्रान्सफर, होईल मोठा फायदा

वाहतुकीचा कोणताही नियम भंग केला तर किमान दंड 500 तर कमाल दंड 25 हजार रुपये आणि तीन वर्षे तुरुंगवास इतका आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांनी नियम तोडले तर त्याची शिक्षा पालक आणि वाहन मालकांना भोगावी लागणार आहे.

VIDEO: मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांब रांगा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 9, 2019 12:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading