जाहिरात
मराठी बातम्या / मनी / आधार कार्ड हरवलं तर कुठेही जाण्याची नाही गरज, UIDAI ने सुरू केली नवी सेवा

आधार कार्ड हरवलं तर कुठेही जाण्याची नाही गरज, UIDAI ने सुरू केली नवी सेवा

आधार कार्ड हरवलं तर कुठेही जाण्याची नाही गरज, UIDAI ने सुरू केली नवी सेवा

आधार कार्ड हे एक महत्त्वाचं कागदपत्रं आहे.UIDAI ने आधार अ‍ॅपचं एक नवं व्हर्जन लाँच केलं आहे. या नव्या अ‍ॅपचं नाव आहे mAadhaar.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 20 जानेवारी : आधार कार्ड हे एक महत्त्वाचं कागदपत्रं आहे.UIDAI ने आधार अ‍ॅपचं एक नवं व्हर्जन लाँच केलं आहे. या नव्या अ‍ॅपचं नाव आहे mAadhaar. हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि IOS युजर्स सोप्या पद्धतीने डाउनलोड करू शकतात. हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि अ‍ॅपल प्ले स्टोअरमधून डाउनलोड होतं. तुम्ही या अ‍ॅपच्या मदतीने आधार कार्ड रिप्रिंट करण्याची विनंती करू शकता. आधार रिप्रिंटसाठी तुम्हाला 50 रुपये सर्व्हिस चार्ज द्यावा लागेल. तुम्ही कार्डासाठी अर्ज दिल्यानंतर 15 दिवसांच्या आत तुम्हाला कार्ड मिळेल. फक्त नवं आधार कार्ड तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड पत्त्यावरच पाठवलं जाईल. नव्या अ‍ॅपमध्ये मिळणार या सुविधा नवं आधार अ‍ॅप वारण्याच्या दृष्टीने खूपच सुलभ आहे. यामध्ये ऑफलाइन KYC, QR कोड स्कॅन, रिप्रिंटची ऑर्डर देणं, अ‍ॅड्रेस अपडेट करणं, आधार व्हेरिफाय करणं, ई मेल व्हेरिफाय करणं, UID रिट्रीव्ह रिक्वेस्ट अशी कामं सोप्या पद्धतीने करता येतील. या अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाइन रिक्वेस्टचं स्टेटस चेक करता येईल. (हेही वाचा : सामान्य माणसांना धक्का, फोनवर बोलणं यावर्षी होणार महाग) असं Install करा mAadhaar अ‍ॅप गूगल किंवा अ‍ॅपलच्या प्ले स्टोअरमध्ये जा. इन्स्टॉल बटनावर क्लिक करा. यानंतर रिक्वेस्ट द्या. यानंतर फोनमध्ये हे अ‍ॅप इन्स्टॉल केलं जाईल. तुम्हाला या अ‍ॅपमध्ये पासवर्ड सेट करायचा आहे. हे अ‍ॅप डाउनलोड केलंत तर तुम्हाला आधार कार्डाबद्दल काळजी करण्याची गरज नाही. कोणत्याही कामासाठी आधार कार्ड हवं असेल तर त्याचा तपशील तुम्हाला इथे मिळू शकतो.

(हेही वाचा : ID आणि पासवर्ड विसरलात तरी टेन्शन नॉट, असं करू शकता Login)

====================================================================================

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात