सामान्य माणसांना धक्का, फोनवर बोलणं यावर्षी होणार महाग

सामान्य माणसांना धक्का, फोनवर बोलणं यावर्षी होणार महाग

यावर्षी तुमचं मोबाइलचं बिल वाढू शकतं. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, टेलिकॉम कंपन्या मोबाइलच्या दरात 25 ते 30 टक्क्यांची वाढ करू शकतात. कंपन्यांच्या अ‍ॅव्हरेज रेव्हेन्यूमध्ये फारशी वाढ झालेली नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 जानेवारी : यावर्षी तुमचं मोबाइलचं बिल वाढू शकतं. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार टेलिकॉम कंपन्या मोबाइलच्या दरात 25 ते 30 टक्क्यांची वाढ करू शकतात. कंपन्यांच्या अ‍ॅव्हरेज रेव्हेन्यूमध्ये फारशी वाढ झालेली नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

भारतात टेलिकॉम सर्व्हिसवर सामान्य लोकांचा जो खर्च होतो तो इतर देशांच्या तुलनेत बराच कमी आहे. Vodaphone-idea आणि भारती एअरटेल या कंपन्यांना अॅडजस्ट ग्रॉस रेव्हेन्यूची मोठी रक्कम भरावी लागेल.

Vodaphone-Idea च्या अडचणी वाढणार

या कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी फोनचे दर वाढवावे लागणार आहेत. व्होडाफोन- आयडिया या कंपनीच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. ही कंपनी टेलिकॉम व्यवसायातूनच बाहेर जाण्याची चिन्हं आहेत. असं झालं तर टेलिकॉम मार्केटमध्ये भारती एअरटेल आणि रिलायन्स Jio याच कंपन्या राहतील.

IIFL सिक्युरिटीजचे संचालक संजीव भसीन यांनी ET ला सांगितलं, मागच्या 3 वर्षांत यूजर्सचा टेलिकॉमशी जोडलेल्या सर्व्हिसेसवर कमी खर्च झालाय. टेलिकॉम कंपन्या यावर्षी मोबाइलच्या दरात 30 टक्क्यांची जास्त वाढ करू शकतात.

मागच्या वर्षीअखेर वाढलं भाडं

भारती एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि रिलायन्स Jio या कंपन्यानी मागच्या वर्षीअखेर प्रिपेडचे दर 14 ते 33 टक्क्यांनी वाढवले होते. ही 3 वर्षांतली पहिली वाढ होती. यामुळे या कंपन्यांचा ARPU सध्या 120 रुपयांहून पुढच्या तिमाहीमध्ये 160 रुपयांवर जाऊ शकतो. पण व्होडाफोन आयडियाला सरकारकडून प्रलंबित रकमेबद्दल दिलासा मिळाला नाही तर त्यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात. त्यामुळेच त्यांना मोबाइलचे दर वाढवावे लागतील.

मोबाइल इंटरनेटचा वापर वाढला

रिलायन्स Jio ही कंपनी 3 वर्षांपर्वी सुरू झाली. त्यानंतर मोबाइल इंटरनेटचा वापर खूपच वाढला आहे. आता मोबाइल युजर्स डेटावर जास्त खर्च करण्यात मागेपुढे पाहणार नाहीत, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आता व्होडाफोन आयडिया ही कंपनी टेलिकॉम क्षेत्रात राहते की नाही यावर मोबाइलच्या दरातली वाढ अवलंबून आहे. व्होडाफोन आयडिया ही कंपनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यासह आणखी पर्यायांवर विचार करते आहे.

===================================================================================

First published: January 20, 2020, 2:05 PM IST

ताज्या बातम्या