ID आणि पासवर्ड विसरलात तरी टेन्शन नॉट, असं करू शकता Login

ID आणि पासवर्ड विसरलात तरी टेन्शन नॉट, असं करू शकता Login

बऱ्याचवेळा हा पसवर्ड आपण विसरतो अशावेळी ऑनलाइन बँकिंग सेवेचा लाभ घेता येत नाही किंवा पासवर्ड लॉक झाल्यानं समस्या निर्माण होते.

  • Share this:

18 जानेवारी: इंटरनेटच्या जगात पासवर्ड लक्षात ठेवणं महत्त्वाचं असतं. तुमच्या पासवर्ड कुणाच्याही हातात लागला तर तुमचं खात काही सेकंदात रिकामं होऊ शकतं. त्यामुळे आपल्या खात्याचा ID आणि पासवर्ड दोन्ही कायम गुप्त ठेवणं महत्त्वाचं असतं. बऱ्याचवेळा हा पसवर्ड आपण विसरतो अशावेळी ऑनलाइन बँकिंग सेवेचा लाभ घेता येत नाही किंवा पासवर्ड लॉक झाल्यानं समस्या निर्माण होते. अशावेळी तुम्हाला जर पैसे हवे असतील तर ग्राहकांची अडचण होऊ नये म्हणून ICICI बँकेनं एक सिस्टिम लाँच केली आहे.

बँकेनं दिलेल्या माहितीनुसार या सिस्टिममध्ये तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर आलेला OTP सर्वात महत्त्वाचा असेल. या सिस्टिमवर तुम्ही तुमचा रजिस्टर मोबाईलनंबर, डेबिटकार्ड पिन आणि ओटीपीच्या सहाय्यानं लॉगइन करून ऑनलाइन पैशांची देवाणघेवाण करू शकता.

ही सिस्टिम वापरण्याची प्रक्रिया कशी असेल जाणून घ्या

सर्वात पहिलं ग्राहकांना बँकेच्या ऑफिशियल www.icicibank.com वेबसाइटला भेट द्या

त्यानंतर Login अथवा नेट बँकिंग जो पर्याय उपलब्ध असेल त्यावर क्लिक करा.

त्यानंतर तुमच्या बँकेत असलेला रजिस्टर्ज मोबाइलनंबर अपलोड करा. त्यावर तुम्हाला एक OTP येतील. त्यानंतर तुम्हाला ओटीपी अपलोड करायचा आहे. त्यामध्ये एक ओटीपी आणि डेबिट पीन अपलोड करून प्रोसेस करायचं आहे.

हे प्रोसेस झालं की तुम्ही ऑनलाइन नेटबँकिंग सुविधेचा लाभ घेऊ शकता. त्यामुळे आता तुम्ही ऑनलाईन लॉगइनचा आयडी किंवा पासवर्ड विसरला असाल तर आयसीआयसीयाच्या या सिस्टिमद्वारे लॉगइन करून सेवेचा लाभ घेऊ शकता. त्यामुळे तुमचं काम अडणार नाही.

हेही वाचा-धमाका ऑफर! Vivo चा फोन झाला तब्बल 7,500 रुपयांनी स्वस्त

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 18, 2020 11:20 AM IST

ताज्या बातम्या