मुंबई : भारतात कोणतेही बँक किंवा ऑनलाईन व्यवहार करायचे किंवा पोस्टात जरी खातं उघडायचं झालं तरी आधार कार्ड आणि पॅन कार्ड विचारलं जातं. तुमचं ओळखपत्र फार महत्त्वाचं आहे. तुम्ही बँक पोस्टात KYC केलं नसेल तर तेही करुन घ्या. आता तुमच्याकडे ही शेवटची संधी आहे. 30 जूनआधी तुम्ही हे काम केलं नाही तर मात्र तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार तर नाहीच शिवाय लोनसाठी देखील अर्ज करता येणार नाही. पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचं ओळखपत्र म्हणून ओळखलं जातं. मात्र आता हे एकमेकांना लिंक करणं बंधनकारक आहे. तुम्ही अजूनही केलं नसेल तर तुमच्याकडे ही शेवटची संधी आहे. त्यानंतर तुमचं पॅनकार्ड कायमचं बंद होईल आणि 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.
आधार-पॅन लिंक करण्यात तुम्हाला येते का अडचण? मग हे तपासून पाहाआधार पॅन जर लिंक नसेल तर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेता येणार नाही. एवढंच नाही तर आता तुम्हाला लोन देखील मिळणार नाही. प्रत्येक आर्थिक काम पूर्ण करण्यासाठी पॅन कार्डचा वापर केला जातो. आयकर रिटर्न भरण्यापासून ते बँक खाते उघडण्यापर्यंत किंवा मालमत्ता खरेदी करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे.
जर तुम्ही पॅन आणि आधार कार्ड लिंक केलं नसेल, तर 30 जूनपर्यंत एक हजार रुपये दंड भरून ते लिंक करुन घ्या. अन्यथा यानंतर तुम्ही अडचणीत येऊ शकता. या संदर्भात आयकर विभागाने ट्विट करून आवाहन केलं आहे. पॅनकार्ड धारकांनी 30 जून 2023 पर्यंत पॅन आधार कार्डशी लिंक करून घ्यावं असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Aadhar card पॅनशी लिंक आहे की नाही कसं शोधायचं? जर तुम्ही 30 जूनपर्यंत लिंक केलं नाही तर ते अवैध ठरवलं जाईल. तुम्हाला यासाठी 10 हजाराचा दंड आकारण्यात येईल. याआधी सरकारने बरेचवेळा मुदत वाढवली आहे. मात्र यापुढे मुदत वाढवली जाणार नाही असंही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकतं. पॅन कार्डशिवाय तुम्ही आयकर रिटर्न भरू शकणार नाही.
दुसरीकडे, जर तुम्ही शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली तर तुम्हाला तिथेही समस्यांना सामोरे जावे लागेल. याशिवाय, पॅन कार्ड अवैध झाल्यास, व्यक्तीला कर लाभ आणि क्रेडिट सारखे फायदे मिळणार नाहीत आणि बँक कर्ज देखील घेऊ शकणार नाहीत. आधार आणि पॅन लिंक कसे करावे incometax.gov.in या आयकर वेबसाइटवर जा यानंतर ‘लिंक आधार’ वर क्लिक करा. तिथे तुम्हाला लॉगिन करण्याचा पर्याय दिसेल. तुम्ही रजिस्टर केलं नसेल तर आधी रजिस्टर करून लॉगइन करा. त्यात तुमची जन्मतारीख पॅन क्रमांक आणि यूजर आयडी सोबत टाका. आधार कार्डावर छापल्याप्रमाणे जन्मतारीख टाका. यानंतर तुमच्या खात्याच्या प्रोफाइल सेटिंगमध्ये जा. येथे आधार कार्ड लिंक पर्यायावर क्लिक करा. आता आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका. तुम्हाला खाली आधार लिंकचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. यानंतर तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यात येईल.