नवी दिल्ली, 31 मार्च : तुम्ही पॅन कार्ड-आधार कार्ड लिंक केलं का? अजूनही पॅन-आधार लिंक केलं नसेल, तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने पॅन कार्डला आधारशी लिंक करण्याची मुदत आणखी वाढवली आहे. त्यामुळे आता 30 जून 2021 पर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक करता येणार आहे.
Date for issue of notice under section 148 of Income-tax Act,1961, passing of consequential order for direction issued by the Dispute Resolution Panel (DRP) & processing of equalisation levy statements also extended to 30th April, 2021.(2/2)
— Income Tax India (@IncomeTaxIndia) March 31, 2021
यापूर्वी पॅन-आधार लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 होती. केंद्र सरकारने आज बुधवारी आधार-पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख, शेवटच्या काही तासांत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज बुधवार 31 मार्च 2021 पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख होती. परंतु आजच्या शेवटच्या दिवशी इनकम टॅक्स डिपार्टमेंटची वेबसाईट अचानक हँग होत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत साईट क्रॅश होत असल्याने लोक पॅन - आधार लिंक करू शकत नव्हते. अनेकांनी ट्विटरवर याबाबत तक्रार केल्यानंतर पॅन-आधार लिंक करण्याची तारीख अखेर वाढवण्यात आली.
(वाचा - PAN-Aadhaar Linking: इनकम टॅक्स डिपार्टमेंटची वेबसाईट हँग, SMS द्वारे असं करा लिंक )
सरकारकडून सध्या तीन महिन्यांची मुदत वाढवण्यात आली आहे. मात्र इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यास समस्या येत असल्यास, मोबाईलवरुन SMS करुनही आधार-पॅन लिंक करता येणार आहे. UIDPAN टाईप करून 12 अंकी Aadhaar नंबर लिहा आणि त्यानंतर 10 अंकी पॅन नंबर लिहा. आता हा एसएमएस 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवा. UIDPAN<आधार क्रमांक><पॅन क्रमांक> उदा. UIDPAN 111122223333 AAAPA9999Q अशाप्रकारे एसएमएसद्वारेही पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करता येणार आहे.