नवी दिल्ली, 07 ऑगस्ट: घरामध्ये नवीन भाडेकरू ठेवताना, एखादा नोकर किंवा ड्रायव्हरला काम देताना संबंधित व्यक्तीची ओळख पटवणं गरजेचं असतं. अशावेळी ती व्यक्ती खोटी ओळख तर सांगत नाही आहे ना हे तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने शोधून काढू शकता. तुम्ही त्या व्यक्तीचं आधार कार्ड (Aadhaar Card) खरं आहे की नाही हे तपासू शकता. आधार कार्ड जारी करणारी संस्था UIDAI ने लोकांना आधार व्हेरिफाय करण्याची पद्धत सांगितली आहे. UIDAI ने असा इशारा देखील दिला आहे की, सर्व 12 आकडी क्रमांक आधार नंबर असत नाही. काही वेळा खोटा आधार क्रमांक सांगून फसवणूक होऊ शकते. समोरच्याची ओळख योग्य आहे का हे तुम्ही आधारच्या साहाय्याने माहित करून घेऊ शकता UIDAI ने आधार कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीबाबत इशारा दिला आहे. UIDAI ने म्हटलं आहे की, आधार कार्ड हे कार्डधारकाची ओळख म्हणून स्विकार करण्यापूर्वी ते व्हेरिफाय करा. तुम्ही Aadhar Card व्हेरिफिकेशनची प्रक्रिया ऑनलाइन करू शकता. सोपी पद्धत वापरून हे काम करता येईल. तुम्हाला याकरता UIDAI च्या वेबसाइट वर जावे लागेल. हे वाचा- Airtel चा लाखो ग्राहकांना झटका! पाठवलेल्या एका मेसेजमुळे मागावी लागली माफी ऑनलाइन कशाप्रकारे कराल आधार व्हेरिफाय? »UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार आधार क्रमांक व्हेरिफाय करण्यासाठी सर्वात आधी resident.uidai.gov.in/verify या लिंकला भेट द्या »याठिकाणी 12 अंकी आधार क्रमांक एंटर करा »त्यानंतर सुरक्षा कोड आणि कॅप्चा प्रविष्ट करा हे वाचा- जगभरात चायनीज स्मार्टफोनचीच चलती! ॲपल-सॅमसंगपेक्षा Xiaomiची विक्री जास्त »Proceed to Verify या पर्यायावर क्लिक करा »यानंतर लगेच 12 अंकी आधार क्रमांकाचे व्हेरिफिकेशन स्क्रीनवर उपलब्ध होईल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.