Home /News /money /

Home Loan: होम लोनविषयी जाणून घ्या सर्वकाही, घर बांधण्यासाठीही मिळतं कर्ज?

Home Loan: होम लोनविषयी जाणून घ्या सर्वकाही, घर बांधण्यासाठीही मिळतं कर्ज?

Home Loan: कोणतीही बँक किंवा वित्तिय संस्था ग्राहकांचे उत्पन्न आणि रीपेमेंटची कॅपॅसिटी पाहून कर्ज देते. कर्जाशी संबंधित सर्व माहिती बँकांच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

    नवी दिल्ली, 26 सप्टेंबर: सध्या बहुतेक बँकांनी त्यांच्या गृहकर्जाचे दर (Interest Rate on Home Loan) आणखी कमी केले आहेत. सध्या, गृह कर्जाचे दर आतापर्यंतच्या सर्वात खालच्या स्तरावर आहेत. तसेच, कोरोना काळानंतर लोकांमध्ये घर खरेदी करण्याची इच्छा झपाट्याने वाढली आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही घर खरेदी करायचे असेल किंवा तुमचे स्वतःचे बांधकाम करायचे असेल, तर जाणून घ्या कर्जासंबधी महत्त्वाची माहिती.. कोणतीही बँक किंवा वित्तिय संस्था ग्राहकांचे उत्पन्न आणि रीपेमेंटची कॅपॅसिटी पाहून कर्ज देते. कर्जाशी संबंधित सर्व माहिती बँकांच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. कर्जाची पात्रता किंवा ईएमआय कॅल्क्युलेटर याबाबत माहिती याठिकाणी उपलब्ध आहे. याद्वारे, तुम्ही कर्जासाठी पात्र आहात की नाही हे कळू शकेल. होम लोन घेताना लक्षात घ्या या गोष्टी 21 ते 65 वयोगटातील लोकांना गृहकर्ज मिळवता येते. कर्जासाठी अर्ज करणाऱ्यांचे उत्पन्न असणे आवश्यक आहे. जसे की पगारातून कमाई किंवा स्वयंरोजगार. गृहकर्जासाठी आवश्यक किमान क्रेडिट स्कोअर 750 आहे. कर्जाचा कालावधी 5 वर्षे ते 30 वर्षे आहे. कर्ज अर्जदाराचा क्रेडिट हिस्ट्री आणि क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असते. कर्ज देणाऱ्या बँका आणि NBFC चे नियम आणि अटी देखील वेगवेगळ्या आहेत. हे वाचा-बँकांमध्ये स्वस्त दराने गृहकर्ज देण्याची स्पर्धा! तुमच्याकडे घर खरेदीची संधी किती मिळेल होम लोन? सहसा मालमत्तेच्या मूल्याच्या 80 टक्के पर्यंत कर्ज मिळू शकते. 20% डाउन पेमेंट करावे लागेल. बँकिंग तज्ज्ञांच्या मते, ईएमआय कर्ज ग्राहकांच्या उत्पन्नाच्या 60 टक्क्यांपेक्षा कमी असावे. दरम्यान 2 ते 5 लाख रुपयांपर्यंतची गृहकर्जे देखील उपलब्ध आहेत. हे वाचा-PM Kisan: 2000 रुपयांऐवजी मिळू शकतात 4000, लाभ मिळवण्यासाठी जमा करा ही कागदपत्र घर बांधण्यासाठी कर्ज मिळते का? सर्वच बँका घर बांधण्यासाठी कर्ज देत नाहीत. त्यामुळ तुम्हाला जर या कारणाासाठी कर्ज हवं असेल तर त्याआधी कोणत्या बँका किंना NBFC अशाप्रकारचे कर्ज देतात हे जाणून घेणे आवश्यक आहे. काही बँका अशाप्रकारे घराच्या बांधकामासाठी कर्ज देतात मात्र कर्ज देतात पूर्ण रक्कम दिली जात नाही. अशा बँका हप्त्यांमध्ये पैसे देतात. हे तुमच्या घराच्या बांधकामाच्या प्रगतीवर अवलंबून आहे. काही ग्राहकांना कर्जाची छोटी रक्कम देऊ शकतात. परंतु ग्राहकांनी या कारणासाठी वैयक्तिक कर्ज घेणे चांगले होईल. हे अल्प मुदतीचे कर्ज आहे आणि त्याच्या अटी अधिक लवचिक असू शकतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Home Loan

    पुढील बातम्या