मराठी बातम्या /बातम्या /मनी /

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना 9488 कोटींचं फेस्टिव्ह गिफ्ट, 3% DA वाढल्यानंतर किती मिळणार पगार?

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना 9488 कोटींचं फेस्टिव्ह गिफ्ट, 3% DA वाढल्यानंतर किती मिळणार पगार?

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत (cabinet meeting) DA मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रातील 47.14 लाख कर्मचारी आणि 68.62 लाख पेन्शनधारकांना सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. महागाई भत्त्याचा नवीन दर जुलै 2021 पासून लागू होईल.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर: केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी 3 टक्के महागाई भत्ता (Dearness Allowance Hike) आणि महागाई सवलत (Dearness Relief Hike) वाढ मंजूर केली. यामुळे आता डीए 28 टक्क्यांवरून (DA Hike News Today) वाढून 31 टक्के झाला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर (Anurag Thakur on DA Hike) यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रातील 47.14 लाख कर्मचारी आणि 68.62 लाख पेन्शनधारकांना सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. महागाई भत्त्याचा नवीन दर जुलै 2021 पासून लागू होईल. महागाई वाढल्यामुळे केंद्र सरकारने डीए वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. या सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सध्याच्या महागाईच्या काळात ही अत्यंत आनंदाची बातमी आहे, दिवाळीआधीच त्यांना गिफ्ट मिळालं आहे. सरकारी तिजोरीवर पडणार एवढा भार केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission latest News) डीए आणि डीआरमध्ये झालेल्या 3 टक्के वाढीनंतर सरकारी तिजोरीतून वार्षिक 9488.7 कोटी रुपये खर्च होतील. त्यांनी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेलं फेस्टिव्ह गिफ्ट असं या निर्णयाला म्हटलं आहे. ठाकुर यांनी दिलेल्या माहितीनुसार, DA आणि DR दर ऑल इंडिया कंज्यूमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्समधील वाढीनुसार निश्चित केले जातात. वाढत्या महागाईला तोंड देताना डीए आणि डीआरमध्ये झालेली ही वाढ कर्मचाऱ्यांच्या फायद्याची ठरणार आहे. वाचा-'या' कर्मचाऱ्यांसाठी आजच दिवाळी! मोदी सरकारने DA आणखी 3% नी वाढवला किती येणार पगार? >> जर तुमचा मूळ पगार (Basic Salary) 18,000 रुपये असेल तर तुम्हाला आता 5030 रुपये महागाई भत्ता मिळत आहे. सध्या डीए मूळ वेतनाच्या 28% आहे. >> आता त्यात 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे म्हणजेच आता तुम्हाला 31 टक्के दराने महागाई भत्ता मिळेल अर्थात आता तुम्हाला 5,580 रुपये डीए मिळेल. >> केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18000 रुपये असल्यास, त्यांना मिळणारा DA आणखी 540 रुपयांनी वाढेल. >> तुमचा मूळ पगार जितका जास्त तितका जास्त डीए येईल. वाचा-PPF वरील व्याजदर किती असावा? काय आहे RBI चं म्हणणं आणखी वाढणार महागाई येणाऱ्या काळात सामान्यांना महागाईचा आणखी फटका बसण्याची शक्यता आहे. आधीच खाद्यतेल आणि इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे सामान्यांच्या खिशाला चाप बसत आहे, त्यातच या दोन्हीच्या वाढीमुळे महागाईवर आणखी परिणाम होत आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड (IMF) ने देखील असा भारतातीव महागाई दराचा अंदाज 4.9 टक्क्यांवरून 5.6 टक्के केला आहे. याकरता आयएमएफने जगभरातील वाढत्या महागाईचा हवाला दिला आहे. आयएमएफने भारताच्या जीडीपी ग्रोथ (GDP Growth) चा अंदाज 9.5 टक्क्यांवर कायम ठेवला आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Central government, Money, Pm modi, PM narendra modi

    पुढील बातम्या