नवी दिल्ली, 28 जुलै: तुम्ही जर गुंतवणुकीचा विचार करत आहात तर एसआयपी (Systematic Investment Plan SIP) हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. सिस्टेमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा एक प्रसिद्ध मार्ग आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या म्युच्युअल फंडात (Mutual Fund) तुमच्या सुविधेनुसार वेगवेगळ्या हप्त्यांच्या स्वरुपात एक निश्चित रक्कम गुंतवू शकता. ज्यांना शेअर बाजारात (Share Market) थेट एकरकमी गुंतवणूक करायची नाही आहे, अशांसाठी एसआयपी एक चांगला पर्याय आहे. SIP मध्ये तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक केली तर जास्त रिटर्न मिळण्याची शक्यता आहे. बाजारात अशा अनेक एसआयपी स्कीम आहेत ज्यामध्ये तुम्ही 100 ते 500 रुपयांपासून देखील गुंतवणूक सुरू करू शकता.
हे वाचा-ऑनलाइन बँकिंगमध्ये असुरक्षिततेचा धोका? SBIने Yono Lite App जोडलं महत्त्वाचं फीचर
गेल्या 5 वर्षात काय आहे रिटर्न?
बाजारात अशा काही म्युच्युअल फंड स्कीम्स आहेत, ज्यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये 15 ते 25 टक्क्यांपर्यंत वार्षिक रिटर्न दिला आहे. व्हॅल्यू रिसर्चच्या मते, सर्वात चांगला रिटर्न देण्यात PGIM इंडिया मिडकॅप अपॉर्चुनिटी फंड, कोटक स्मालकॅप फंड आणि मिरे अॅसेट्स इमर्जिंग ब्लूचिप टॉपवर आहेत.
1. PGIM इंडिया मिडकॅप अपॉर्चुनिटी फंडने गेल्या पाच वर्षात 25 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. पाच वर्षात 5000 मंथली SIP (एकूण गुंतवणूक 3 लाख) चे मुल्य 11 लाख रुपये. यामध्ये तुम्ही कमीतकमी SIP 1000 रुपयांची करू शकता.
हे वाचा-खरेदीआधी तपासा काय आहे सोन्याचा आजचा भाव, एवढ्या दरानं स्वस्त झालं सोनं
2. कोटक स्मालकॅप फंडने गेल्या 5 वर्षात 23 टक्के रिटर्न दिला आहे. पाच वर्षात 5000 मंथली SIP (एकूण गुंतवणूक 3 लाख) चे मुल्य 10.54 लाख रुपये झालं आहे. यामध्ये तुम्ही कमीतकमी SIP 1000 रुपयांची करू शकता.
3. मिरे अॅसेट्स इमर्जिंग ब्लूचिपने गेल्या पाच वर्षात 23 टक्के रिटर्न दिला आहे. पाच वर्षात 5000 मंथली SIP (एकूण गुंतवणूक 3 लाख) चे मुल्य 10.47 लाख रुपये झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Savings and investments, Share market