मराठी बातम्या /बातम्या /मनी /ऑनलाइन बँकिंगमध्ये असुरक्षिततेचा धोका? ग्राहकांसाठी SBI ने Yono Lite App जोडलं महत्त्वाचं फीचर

ऑनलाइन बँकिंगमध्ये असुरक्षिततेचा धोका? ग्राहकांसाठी SBI ने Yono Lite App जोडलं महत्त्वाचं फीचर

बँकेने त्यांच्या ग्राहकांना ऑनलाइन फ्रॉडपासून वाचण्यासाठी एसबीआय योनो लाइट हे अॅप अपग्रेड केलं आहे. या नवीन सिक्योरिटी फीचरच्या माध्यमातून तुमच्या एसबीआय योनो अकाउंटला दुसरं कुणी दुसऱ्या फोनमधून अॅक्सेस करू शकत नाही.

मुंबई, 28 जुलै: स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) या देशातील सर्वात मोठ्या बँकेचे तुम्ही ग्राहक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँकेने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की एसबीआयचे ऑनलाइन बँकिंग (SBI Online Banking) आता अधिक सुरक्षित आहे. YONO Lite app चे लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करा. एसबीआयमे ऑनलाइन बँकिंग अधिक सुरक्षित करण्यासाठी YONO Lite app मध्ये एक नवीन सिक्योरिटी फीचर जोडले आहे.

बँकेने त्यांच्या ग्राहकांना ऑनलाइन फ्रॉडपासून वाचण्यासाठी एसबीआय योनो लाइट हे अॅप अपग्रेड केलं आहे. या नवीन सिक्योरिटी फीचरच्या माध्यमातून तुमच्या एसबीआय योनो अकाउंटला दुसरं कुणी दुसऱ्या फोनमधून अॅक्सेस करू शकत नाही.

केवळ रजिस्टर्ड नंबरवरुनच वापरता येईल SBI YONO

SBI ऑनलाइन बँकिंगसाठी तुम्ही जर YONO चा वापर करत असाल आणि बँक खात्यामध्ये रजिस्टर्ड मोबाइलवरुन तुम्ही योनोचा वापर करत असाल तर तुम्हाला हे नवं सिक्योरिटी फीचर वापरता येईल. कोणत्याही अन्य मोबाइल क्रमांकावरुन SBI YONO चा वापर करत असाल तर तुमच्या अकाउंटवरुन तुम्हाला कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. यामुळे SBI ने ग्राहकांना एसबीआय योनोच्या वापराकरता त्याच मोबाइल क्रमांकाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे, जो त्यांच्या बँक खात्यामध्ये रजिस्टर्ड आहे.

हे वाचा-खरेदीआधी तपासा काय आहे सोन्याचा आजचा भाव, एवढ्या दरानं स्वस्त झालं सोनं

ऑनलाइन फ्रॉड होतील कमी

नेट बँकिंगचा वापर गेल्या काही काळापासून वाढला आहे. मात्र जेवढा वापर वाढला आहे, तेवढ्याच प्रमाणात धोकाही वाढला आहे. एसबीआयचं हे सिक्योरिटी फीचर ग्राहकांसाठी फायद्याचं ठरेल, जे मोठ्या प्रमाणात नेट बँकिंगचा वापर करतात. तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरुन हे अॅप डाउनलोड करू शकता किंवा अपडेट करू शकता. अॅप अपडेट केल्यानंतर ग्राहकांना ओटीपीच्या माध्यमातून  व्हेरिफिकेशन करावं लागेल. यानंतर तुम्ही या अॅपच्या माध्यमातून विविध व्यवहार करू शकता.

First published:
top videos

    Tags: SBI, SBI bank, SBI Bank News