नवी दिल्ली, 28 जुलै: बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) सोन्याचे दर किरकोळ दराने वाढले आहेत, तर चांदीच्या दरातंही वाढ झाली आहे. दरम्यान असं असलं तरी आजही सोन्याचे दर रेकॉर्ड हायपेक्षा (Record High) जवळपास 8530 रुपयांनी स्वस्त आहेत. MCX वर ऑगस्टच्या डिलिव्हरीच्या सोन्याच्या दरात (Gold Price Today) 37 रुपयांची किरकोळ वाढ झाली असून दर 47610 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. तर चांदीच्या दरात (Silver Price Today) 243 रुपयांची वाढ झाली आहे, या वाढीनंतर चांदीचे दर 66299 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचले आहेत. दरम्यान सराफा बाजारात मंगळवारी सोन्याची किंमत (Gold Rates) 225 रुपये प्रति तोळाने कमी झाली होती, तर चांदीही (Silver Rates) 567 रुपये प्रति किलोने उतरली होती.
आंतरराष्ट्रीय बाजाराबाबत (Gold Rates in International Market) बोलायचे झाले तर याठिकाणी मंळवारी सोन्याचे दर 1,800 डॉलर प्रति औंसपेक्षा कमी होते. यूएस फेडच्या बैठकीपूर्वी गुंतवणुकदारांमध्ये सतर्कता पाहायला मिळते आहे.
हे वाचा-ही बँक स्वस्तात विकत आहे प्रॉपर्टी, वाचा कशाप्रकारे खरेदी कराल स्वत:चं घर?
24 कॅरेट सोन्याचा भाव
गुड्सरिटर्न वेबसाइटच्या मते 24 कॅरेट सोन्याचा भाव देशातील विविध शहरात वेगवेगळा आहे. दिल्लीममध्ये दर 50990 रुपये प्रति तोळा असून, चेन्नईमध्ये दर 49130 रुपये, मुंबईमध्ये 47650 रुपये तर कोलकातामध्ये दर 49180 रुपये प्रति तोळा आहे.
भारत आहे सर्वात मोठा सोनं आयात करणारा देश
भारतामध्ये मोठ्या प्रमाणात सोनं आयात केलं जातं, साधारण वार्षिक 800-900 टन सोन्याची आयात भारतात होते. मुख्यत्त्वे दागिन्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी सोन्याची आयात केली जाते. चालू आर्थिक वर्षाच्या पहि्ल्या तीन महिन्यात रत्न आणि दागिन्यांची निर्यात वाढून 9.1 अब्ज डॉलर झाली आहे. गेल्यावर्षीच्या या तिमाहीमध्ये ही निर्यात 2.7 अब्ज डॉलर होती.
हे वाचा-पुढील महिन्यात डबल फायदा, पगारात होणार वाढ; जाणून घ्या किती मिळणार वाढीव रक्कम
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर
तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver, Silver prices today