Home /News /maharashtra /

आईला शिवीगाळ करताना अडवले अन् लहान भावाने फिरवला मोठ्या भावाच्या गळ्यावर सुरा

आईला शिवीगाळ करताना अडवले अन् लहान भावाने फिरवला मोठ्या भावाच्या गळ्यावर सुरा

लहान भाऊ दिलीप गेडाम हा दारूच्या आहारी गेला होता. दारूसाठी तो नेहमी आई-वडिलांकडे पैसे मागत होता. एवढंच नाहीतर पैसे नाही दिले तर तो त्यांना त्रास देत होता.

यवतमाळ, 12 जानेवारी : मोठ्या भावाने लहान भावाला काम सांगणे ही प्रत्येक घराघरातली गोष्ट आहे. पण, दारूच्या आहारी गेलेल्या लहान भावाने वडिलांकडे पैसे मागितले हे पाहून मोठ्या भावाने हटकले. त्यामुळे रागाच्या भरात लहान भावाने मोठ्या भावावर (elder brother) चाकूने सपासप वार करून खून (murder) केल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये (yavatmal) घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी शहरातील घाटी बेघर परिसरात ही घटना घडली आहे. दीपक ज्योतिराम गेडाम असं मृत भावाचे आहे. तर आरोपी लहान भाऊ दिलीप गेडाम असं या तरुणाने नाव आहे. लहान भाऊ दिलीप गेडाम हा दारूच्या आहारी गेला होता. दारूसाठी तो नेहमी आई-वडिलांकडे पैसे मागत होता. एवढंच नाहीतर पैसे नाही दिले तर तो त्यांना त्रास देत होता. आज पुन्हा दिलीप दारूसाठी आईकडे पैसे मागितले. पण आईने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे पैशासाठी दिलीपने आपल्या आईलाच  शिवीगाळ करून त्रास देत होता. (पुण्यातला गाणारा पोलीस पुन्हा चर्चेत; 'पुष्पा'च्या श्रीवल्लीचा केला रावडी मराठी) यामुळे मोठा भाऊ दीपक गेडाम याने लहान भावाला समाजवण्याचा प्रयत्न केला.  आई-वडिलांना त्रास का देतो, असं म्हणत हटकले होते. पण दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात लहान भाऊ दिलीपने चाकू घेऊन मोठा भाऊ दीपकवर सपासप वार केले. मानेवर आणि छातीवर चाकूने वार केले. त्यामुळे दीपक जागेवरच कोसळला. (Sky Diving चा अनुभव घ्यायचा असेल तर महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी नक्की भेट द्या) जखमी अवस्थेत दीपकला तातडीने रुग्णालयात दाखल केले पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी घाटंजी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी दिलीपला अटक करण्यात आली आहे. अगदी किरकोळ वादातून लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केली. या घटनेने समाज मनसुन्न झाले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Murder

पुढील बातम्या