Home /News /entertainment /

VIDEO: पुण्यातला गाणारा पोलीस पुन्हा चर्चेत; 'पुष्पा'च्या श्रीवल्लीचा केला रावडी मराठी रिमेक

VIDEO: पुण्यातला गाणारा पोलीस पुन्हा चर्चेत; 'पुष्पा'च्या श्रीवल्लीचा केला रावडी मराठी रिमेक

अल्लू अर्जुन (allu arjun) आणि रश्मिका मंदना यांचा पुष्पा द राईज हा चित्रपटातील श्रीवल्ली गाणं सगळीकडे धुमाकूळ घालत आहे. आता याचा मराठी रिमेक पुण्याचे पोलिस आतिष खराडे( MARTHI VERSION AATISH KHARADE) यांनी नुकताच बनवला आहे.

    पुणे, 12 जानेवारी- श्रीलंकन गायिका योहानी हिचे 'मनिके मगे हिते' या गाण्याच्या मराठी रिमेकने काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला होता. या गाण्याचा मराठी रिमेक पुण्याचे पोलीस कर्मचारी आतिष खराडे यांनी केला होता.  आता या गाण्यानंतर अल्लू अर्जुन (allu arjun) आणि रश्मिका मंदना यांचा पुष्पा द राईज हा चित्रपटातील श्रीवल्ली गाणं सगळीकडे धुमाकूळ घालत आहे. आता याचा मराठी रिमेक आतिष खराडे( MARTHI VERSION AATISH KHARADE) यांनी नुकताच बनवला आहे. सोशल मीडियावर या गाण्याला चांगलीच (Srivalli Song From Pushpa Marathi Version ) पसंती मिळत आहे. पुष्पा मधील श्रीवल्ली या गाण्याची सगळीकडे क्रेझ पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे सेलेब्सपासून कॉमन मॅनपर्यंत सर्वजण या गाण्याचे रील बनवत आहे. काही दिवसापूर्वी अमरावतीच्या विजय खंदारे यांने या गाण्याचा रिमेक बनवला आहे. त्याच्या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता या गाण्याचा आणखी एक असाच नादखुळा मराठी रिमेक समोर आला आहे. पुण्याचे पोलीस आतिष खराडे यांनी हा रिमेक बनवला आहे. त्यांचा आवजातील या गाण्याची देखील सोशल मीडियावर चांगली क्रेझ पाहायला मिळत आहे. आतिष यांनी मराठी भाषेतून हे गाणं बनवून सर्वांनाच चकित केलं आहे.आतिष खराडे यांचे युट्यूब चॅनेल आहे. त्यावर त्यांनी त्यांची गाणी टाकली आहेत. लोकांकडून या गाण्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता त्यांच्या मराठी श्रीवल्ली या गाण्याला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतिष खराडे यांच्याविषयी थोडसं... आतिष खराडे यांना शाळेपासून गाण्याची आवड होती मात्र पोलिसाची नोकरी देखील महत्वाची होती. म्हणून त्यांना प्रोपेशनल गायक होता आले नाही. परंतु पोलीस कामाच्या तणावातून रिलीफ मिळण्यासाठी त्यांनी आपली ही कला जपली. नव्या गाण्यांसोबत ते रॅप गाणीही लिहितात आणि स्वरबध्द करतात. विजय खंदारे यांने देखील बनवला आहे श्रीवल्लीचा मराठी रिमेक.. विजय खंदारे यावे देखील श्रीवल्ली .(Srivalli Song From Pushpa) या गाण्याचा मराठी रिमेक (srivalli song marathi rimake) बनवला आहे. विजय खंदारे याने या गाण्याला आवज दिला आहे. श्रीनिवास स्टुडिओ अमरावती आणि आदित्य म्युजिक यांनी मिळून हा मराठी व्हर्जन तयार केला आहे. सोशल मीडियावर श्रीवल्लीच्या मराठी व्हर्जनला चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे.या गाण्यात विजय खंदारेसोबत (vijay khandare) तृप्ती खंदारे मुख्य भूमिकेत दिसत आहेत. तिनं या गाण्यात श्रीवल्ली साकारली आहे. वाचा-विषय हार्ड ! 'पुष्पा' मधील श्रीवल्लीचा नादखुळा मराठी रिमेक पाहिला का? अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना ( Allu Arjun and Rashmika Mandanna ) यांच्या मुख्य भूमिका असलेला सुकुमार दिग्दर्शित पुष्पा: द राईज ( ( Pushpa: The Rise Movie ) ) हा सध्या भारतातील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. हा सिनेमा तेलगू, तामिळ, मल्याळम, हिंदीत प्रदर्शित झाला. या सर्वच भाषेत चित्रपटाची गाणी डब करण्यात आलीत. आता याचा मराठी रिमेक देखील चांगलाच व्हायरल झाला आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Allu arjun, Bollywood News, Entertainment, Marathi entertainment, Pune

    पुढील बातम्या