Sky Diving चा अनुभव घ्यायचा असेल तर महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी नक्की भेट द्या

Sky Diving चा अनुभव घ्यायचा असेल तर महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी नक्की भेट द्या

जर तुम्हाला साहसी खेळ विशेषत: स्कायडायव्हिंग आवडत असेल, तर तुम्ही भारतातील अनेक प्रसिद्ध स्काय डायव्हिंग स्थळांना नक्कीच भेट द्यायला हवी, जिथे तुम्ही साहसाने भरलेल्या या साहसाचा आनंद घेऊ शकता. महाराष्ट्रात देखील तुम्ही साहसी खेळांचा आनंद घेऊ शकता.

  • Share this:

मुंबई, 12 जानेवारी : गेल्या दोन वर्षात कोरोना साथीमुळे असलेल्या निर्बंधामुळे अनेकांना घरातच बसून राहावं लागलं आहे. आता निर्बंध कमी झाल्याने पुन्हा फिरायला जाण्याचं प्रमाण वाढत आहे. धावपळीच्या जीवनातून थोडा वेळ रिलॅक्स होण्यासाठी हे गरजेचं असतं. अलीकडे स्कूवा आणि स्काय डायविंगची क्रेझ वाढलेली पाहायला मिळतेय. काही दिवसांपूर्वी आध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांचा एक बंजी जंपिंग करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आयुष्यात एकदातरी असे साहसी खेळ खेळावे अशी अनेकांची इच्छा असते. पण अनेकांना हा अनुभव कुठे घेता येईल हेच माहीत नसते. काळजी करू नको, आम्ही कशासाठी आहोत. चला अशाच काही साहसी खेळांबद्दल जाणून घेऊया.

स्काय डायव्हिंगचे तीन प्रकार आहेत

टँडम जंप: यामध्ये, तुम्ही हार्नेसद्वारे तुमच्या प्रशिक्षकाशी जोडलेले असता. तुम्हा दोघांना एकत्र उडी मारावी लागते, यावेळी प्रशिक्षक दोर ओढतो. या खेळात तुमच्यासोबत प्रशिक्षक असल्याने तुम्हाला यामध्ये जास्त तपशीलवार प्रशिक्षण घेण्याची गरज नाही. शिवाय पहिल्यांदाच अशी गोष्ट करताना कोणीतरी अनुभवी व्यक्ती सोबत असल्याने मनातील भिती कमी होण्यास मदतही होते.

स्टॅटिक लाईन जंप: या प्रकारच्या स्काय डायव्हमध्ये तुम्ही विमानाच्या कॉर्डला जोडलेले असता आणि फ्री फॉलच्या 3 सेकंदांनंतर पॅराशूट आपोआप उघडते. लक्षात घ्या की या प्रकारच्या डायव्हिंगमध्ये 3000 फुटांवरून उडी मारावी लागते. यासाठी सुमारे 6 तासांचे प्रशिक्षण आवश्यक आहे.

फ्री फॉल: डायव्हिंगचा हा प्रकार हलक्या काळजाच्या लोकांसाठी अजिबात नाही. यामध्ये तुम्ही कोणत्याही अटॅचशिवाय उडी मारता आणि फ्री फॉलचा आनंद घेता, हा सर्वात आव्हानात्मक स्काइंग अनुभव आहे. स्काय डायव्हिंग हे सर्वात जोखमीचे असल्याने, त्यासाठी क्लासरूम इंस्ट्रक्शन आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग दोन्ही आवश्यक आहे.

Varanasi | बनारसला जायचे असेल तर 'या' दिवसातच भेट द्या, जाणून घ्या कारण

तुम्ही मुंबई आणि पुण्याजवळ रहात असाल किंवा इथे भेट देण्याचा विचार करत असाल तर या ठिकाणांजवळील अॅम्बी व्हॅलीमध्ये तुम्ही स्काय ड्रायव्हिंगसाठी जाऊ शकता. स्कायडायव्हिंगसाठी अॅम्बी व्हॅली खूप लोकप्रिय आहे. सध्या येथे फक्त टँडम जंपचा आनंद घेता येतो.

पैसे किती लागणार: येथे टँडम जंपसाठी सोमवार ते गुरुवारी कॅम्प लागतो. यासाठी तुम्हाला 20,000 हजार रुपये मोजावे लागतील. त्याचवेळी, शुक्रवार ते रविवार या दिवशी टॅन्डम जंपसाठी 25,000 रुपये शुल्क घेण्यात येते.

वेळ: येथे तुम्ही सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत स्काय डायव्हिंगचा आनंद घेऊ शकता.

Published by: Rahul Punde
First published: January 12, 2022, 10:09 PM IST

ताज्या बातम्या