रवी शिंदे, प्रतिनिधी भिवंडी, 13 सप्टेंबर : सध्या गुन्ह्यांचे आणि बलात्काराचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. या भिवंडीत गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांच्या प्रकारामध्ये वाढ होत आहे. आताही बलात्काराच्या एका प्रकरणामुळे संपूर्ण भिवंडी हादरलं आहे. एका विवाहित महिलेवर दिरासह चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सगळ्यात गंभीर म्हणजे आरोपींमध्ये 2 अल्पवयीन मुलं असल्याचीही माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. भिवंडी शहरातील अंजुरफाटा इथं भिवंडी रोड रेल्वे स्टेशन परिसरातील निर्जन झुडपात एका 25 वर्षीय विवाहितेवर दिरासह चौघा नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बलात्कार झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते पण नारपोली पोलिसांनी आरोपींचा शोध घेत चौघा जणांना ताब्यात घेतलं आहे. भावाच्या बायकोवर तरुणाने बलात्कार केला. त्यानंतर त्याच्या 3 मित्रांनीही तिच्यावर बलात्कार केला. यामध्ये 2 जण अल्पवयीन असल्याचं सांगण्यात येत आहे. नारपोली पोलिसांनी चौघांविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करत कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, विवाहित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. इतर बातम्या - बिझनेस ट्रिपवर गेलेल्या व्यक्तीचा SEX करताना मृत्यू, कोर्टाकडून धक्कादायक निकाल शेतात गेले होते आई-वडील… संधी साधून नराधमाने 6 वर्षाच्या मुलीवर केला अत्याचार पाथर्डी तालुक्यात सहा वर्षाच्या चिमुरडीवर 14 वर्षाच्या मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक तितकीच संतापजनक घटना घडली आहे. पीडित चिमुरडी पहिलीत तर आरोपी मुलगा सातवीत शिक्षण घेत आहे. या प्रकरणी अल्पवयीन आरोपीविरुद्ध पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर बातम्या - या काकूंनी केली ‘गलती से मिस्टेक’, VIDEO होतोय तुफान व्हायरल मंगळवारी (10 सप्टेंबर)ही घटना घडली. पीडितेचे आई-वडील शेतात गेले होते. हीच संधी साधून आरोपीने मुलीवर अत्याचार केला. आई-वडील सायंकाळी घरी आल्यानंतर त्यांना मुलीच्या गुप्तांगातून रक्तस्त्राव होताना दिसला. बुधवारी सकाळी खासगी हॉस्पिटलमध्ये नेले असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. नंतर तिला पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी मुलाविरुद्ध बालकांचे संरक्षण कायदा 2012 (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी पुढील तपास करत आहेत. इतर बातम्या - सर्जरीनंतरही पुन्हा-पुन्हा उगवतं या व्यक्तीच्या डोक्यावर शिंग, डॉक्टरही वैतागले 13 वर्षांच्या मुलीवर चौघांनी केला आळीपाळीने बलात्कार दरम्यान, अशीच एक घटना राज्याची उपराजधानी नागपुरात घडली आहे. 13 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर स्मशानभूमीत चौघांनी सामूहिक बलात्कार केली. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा परिसरात ही घटना आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. इतर बातम्या - मित्राने केलेल्या विनयभंगाबद्दल गर्लफ्रेंडचा खुलासा, प्रियकराने दोस्ताला संपवलं VIDEO : एन्काऊंट स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा अखेर शिवबंधनात अडकले, म्हणाले…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.