दुर्ग (छत्तीसगड)13 सप्टेंबर : प्रेम प्रकरणातून हत्या होण्याचं आणि गुन्हा होण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये वाढले आहेत. देशात प्रत्येक ठिकाणी गुन्हेगारी वाढत चालली आहे. गुन्ह्याचा असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गर्लफ्रेंडची छेड काढल्यामुळे एका तरुणाने मित्राची हत्या केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला ताब्यात घेतलं आहे. शहराच्या महत्त्वाच्या भागात हा प्रकार घडल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीवर स्वत: च्या मित्राची हत्या केल्याचा आरोप आहे. प्रेयसीशी छेडछाड केल्याच्या आरोपावरून आरोपी तरुणाने त्याच्या मित्रावर चाकूने हल्ला करून फरार झाला. यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने जखमीला रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. इतर बातम्या - या काकूंनी केली ‘गलती से मिस्टेक’, VIDEO होतोय तुफान व्हायरल छत्तीसगडच्या दुर्गतील भिलाई नगर पोलीस स्टेशन परिसरातील सेक्टर 9मधल्या दुर्गा पंडालजवळ रात्रीच्या वेळी आरोपी शुभम थॉमसने त्याचा मित्र कैलास गुप्तावर चाकूने हल्ला केला. प्रेयसीला छेडल्याबद्दल शुभम कैलासवर रागावला होता. प्रेयसीला हात लावल्यामुळे रागाच्या भरात कैलास गुप्ता याच्यावर शुभमने चाकूने हल्ला केला आणि फरार झाला. या घटनेनंतर काही तासांनी पोलिसांनी कुम्हारी टोल प्लाझा जवळून आरोपीला अटक केली. मयत कैलास गुप्ता मॉडेल टाऊन स्मृती नगर इथला रहिवासी आहे. इतर बातम्या - सर्जरीनंतरही पुन्हा-पुन्हा उगवतं या व्यक्तीच्या डोक्यावर शिंग, डॉक्टरही वैतागले हत्येचं सांगितलं वेगळंच कारण… चौकशी दरम्यान शुभमने पोलिसांना सांगितलं की, काही दिवसांपूर्वी कैलासने त्याच्या प्रेयसीचा विनयभंग केला होता. शुभम हा कैलासचा बदला घेण्याचा प्रयत्नात होता. मृतक आपल्या मित्रांसह बाहेर फिरायला गेला होता. त्यावेळी सर्वांनी जोरदार मद्यपान केलं होतं. दारूच्या नशेत असलेल्या कैलासचा शुभमशी तिच्या मैत्रिणीविषयी वाद झाला आणि शुभमने कैलासवर चाकूने वार करून पळ काढला. दुर्ग एएसपी रोहित झा यांनी सांगितलं की, चौकशीनंतर पोलिसांनी आरोपी शुभमविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला तुरूंगात पाठवलं आहे. इतर बातम्या - ताईच्या मृतदेहावर डोकं ठेऊन रडताना लहान बहिणीचा मृत्यू, दोघींची सोबत अंत्ययात्रा हॉकी स्टिक तुटेपर्यंत पोलिसांची आरोपीला ‘बॉम्बे कट्टा’ थर्ड डिग्री, धक्कादायक VIDEO व्हायरल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.