सर्जरीनंतरही पुन्हा-पुन्हा उगवतं या व्यक्तीच्या डोक्यावर शिंग, डॉक्टरही वैतागले

श्याम लाल हे गेल्या 5 वर्षापासून हा समस्येला तोंड देत आहेत. वैद्यकीय जगात, हे दुर्मिळ प्रकरण मानलं जातं.

News18 Lokmat | Updated On: Sep 13, 2019 07:23 PM IST

सर्जरीनंतरही पुन्हा-पुन्हा उगवतं या व्यक्तीच्या डोक्यावर शिंग, डॉक्टरही वैतागले

सागर (मध्य प्रदेश) , 13 सप्टेंबर : जर तुमच्या डोक्यावर शिंग आले तर? याचा साधा विचारही करवत नाही ना...पण हे सत्यात घडलं आहे. या सगळ्या धक्कादायक प्रकारामुळे डॉक्टरही चिंतेत आहेत. एका व्यक्तीला डोक्यावर शिंग आलं आहे. डॉक्टरांनी सर्जरी करून हे शिंग काढलंही पण ते पुन्हा आलं. या प्रकारामुळे पीडित व्यक्ती तर हैराण झाला आहेच पण डॉक्टरही चिंतेत आहेत. श्याम लाल असं शिंग आलेल्या 75 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे.

श्याम लाल हे गेल्या 5 वर्षापासून हा समस्येला तोंड देत आहेत. वैद्यकीय जगात, हे दुर्मिळ प्रकरण मानलं जातं. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे. हे प्रकरण एमबीबीएस विद्यार्थ्यांनाही शिकवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्या संपूर्ण सोशल मीडियावर या शिंग आल्याच्या प्रकाराची चर्चा सुरू आहे.

डोक्यावर शिंग घेऊन चालणं विचित्र वाटतं...

डोक्याला शिंग येणं म्हणजे 'हेलबॉय' या हॉलिवूड सिनेमातल्या डोक्यात शिंग असलेल्या कॅरॅक्टरची आठवण करून देतं. त्याच्या डोक्यावर दोन शिंगं होती. श्याम लाल गेल्या 5 वर्षांपासून डोक्यावरच्या शिंगासह जगत आहे. त्यांनी बरीच रुग्णालयं आणि डॉक्टरांच्या भेटी घेतल्या. हे शिंग काढण्यासाठी त्यांनी अनेक वेळा शस्त्रक्रिया केली पण ते परत उगवलं. राहळी इथे पाटणा या खेड्यातील श्याम लाल यादव सांगतात की, ते मागील 5 वर्षांपासून डोक्यावर शिंग घेऊन फिरत आहेत.

ते म्हणतात की, 'या शिंगामुळे दैनंदिन कामात अडचण येत नव्हती, परंतु डोक्यावर शिंग घेऊन चालणं विचित्र वाटत होतं. 5 वर्षाआधी डोक्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तिथे शिंग उगवलं आहे. बर्‍याच डॉक्टरांनी सल्ले दिले पण त्याचा उपयोग झाला नाही.' श्याम लालला यांनी हे शिंग एका स्थानिक केस कापणाऱ्याकडून अनेक वेळा शिंग कापून घेतलं पण ते परत उगवलं.

Loading...

इतर बातम्या - ताईच्या मृतदेहावर डोकं ठेऊन रडताना लहान बहिणीचा मृत्यू, दोघींची सोबत अंत्ययात्रा

शिंग काढण्यासाठी श्याम लाल भोपाळ आणि नागपूरमधील अनेक हॉस्पिटलमध्ये गेले, परंतु त्यांना कुठेही समाधान मिळालं नाही. एवढं झाल्यानंतर त्यांनी आपली समस्या सागर इथल्या खासगी रुग्णालयात डॉ विशाल गजभिये (डॉ. विशाल गजभिये) यांना सांगितली. वरिष्ठ शल्य चिकित्सक डॉ. गजभिये यांनी ऑपरेशन करून अखेर शिंग काढून टाकलं 4 इंचापेक्षा जास्त आकाराचं हे शिंग श्याम लालच्या डोक्यावर कायम असायचं . वैद्यकीय शास्त्रामध्ये अजूनही हे एक दुर्मिळ प्रकरण आहे.

इतर बातम्या - एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांचा राजीनामा, या पक्षातून मिळणार विधानसभा तिकीट

सगळीकडे उपचार करून कंटाळल्यानंतर श्याम लाल यांनी सागरमधील भाग्योदय तीर्थ रुग्णालयाच्या डॉ. विशाल गजभिये यांची भेट घेतली. श्याम लाल यादव यांच्यावर शस्त्रक्रिया करणारे वरिष्ठ सर्जन डॉ. विशाल गजभिये यांनी न्यूज 18 शी बोलताना सांगितलं की, शिंगेची लांबी सुमारे 4 इंच आहे, जाडी देखील पुरेशी आहे.

शिंग कापल्यानंतर कपाळावरची कातडी काढून टाकण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली गेली. डॉ. गजभिये यांच्या मते ही एक दुर्मीळ बाब आहे. वैद्यकीय शास्त्रात याला सेवेसियस शिंग असं म्हणतात. केसांच्या वाढीसाठी डोक्यात नैसर्गिकरित्या उद्भवणारी ग्रंथी असते. ही द्रव सोडते, ज्यामुळे केस चमकदार होतात. दुखापतीमुळे ही ग्रंथी बहुधा थांबली आणि द्रव जमा होत राहिला ज्याने कडक आकार तयार होतो.

इतर बातम्या - या काकूंनी केली 'गलती से मिस्टेक', VIDEO होतोय तुफान व्हायरल

डॉ. गजभिये म्हणतात की, ही एक दुर्मीळ बाब आहे जी अभ्यासाचा विषय आहे. ते आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशनासाठी पाठवण्यात येईल. यासह, वैद्यकीय विज्ञानदेखील वैद्यकीय शाखेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केली जाईल.

VIDEO : शिवबंधनात अडकताच जाधवांनी दिलं मिलिंद नार्वेकरांवर टीकेचं स्पष्टीकरण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: bhopalMbbs
First Published: Sep 13, 2019 07:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...