या काकूंनी केली 'गलती से मिस्टेक', VIDEO होतोय तुफान व्हायरल

या काकूंनी केली 'गलती से मिस्टेक', VIDEO होतोय तुफान व्हायरल

सोशल मीडियावर सध्या फनी व्हिडिओ प्रचंड शेअर केले जातात.

  • Share this:

कोलकाता, 13 सप्टेंबर : सध्या TIK TOK वर व्हिडिओ बनवण्याचा क्रेझ आहे. हल्लीची तरुणाई TIK TOK व्हिडिओ बनवण्यामध्ये व्यस्त असते. अशात एक महिलेचा बॉलिवूडच्या गाण्यावरचा डान्स करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या महिलेचा डान्स पाहिल्यानंतर तुम्ही हादराला. गलतीसे मिस्टेक या गाण्यावर या महिलेने ठेका धरला आहे.

सोशल मीडियावर सध्या फनी व्हिडिओ प्रचंड शेअर केले जातात.

हादेखील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. याला अनेक लोकांनी फेअर आणि लाईक केलं आहे. हा व्हिडिओ बंगालमधून असल्याचं सांगण्यात येत आहे. सुरुवातील या महिलेची मुलगी नाचत होती. त्यानंतर उत्साहात महिलादेखील नाचण्यासाठी आली आणि तिने जो काही ताल धरला त्यानंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.

इतर बातम्या - लाडाची लेक समलैंगिक असल्याचं समजताच वडिलांनी स्वत:ला संपवलं

या आधीही tik tok चे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लोकसभा निवडणुकीवेळी रिना व्दिवेदी यांचा एक टिक टॉक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमधील रिना यांचा डान्स हरियाणाची डान्सर सपना चौधरीची कॉपी म्हटलं जात होतं. या व्हिडिओमध्ये रिना हिरव्या साडीमध्ये सपना चौधरीप्रमाणं डान्स स्टेप करताना दिसत होती. यामध्ये त्यांनी सपनाचं ‘तेरी आख्या का काजल’ या गाण्यावर डान्स करताना दिसत होती. हा व्हिडिओ सर्वांच्या पसंतीत उतरली होती. हा व्हिडिओ कोणत्यातरी लग्नात शूट करण्यात आला होता. ज्यामध्ये रिना कोणत्याही अभिनेत्री पेक्षा कमी दिसत नव्हती. या व्हिडिओमध्ये रिना यांनी सपनापेक्षाही चांगला डान्स केल्याचं काहींचं म्हणणं आहे.

कोण आहे रिना द्विवेदी

रिना द्विवेदी असं या महिला अधिकाऱ्याचं नाव असून सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्यांना भोजपुरी चित्रपटाच्या ऑफर्स देखील आल्या होत्या. पतीच्या मृत्यूनंतर मुलाच्या जबाबदारीमुळे त्यांनी चित्रपटाच्या ऑफर्स नाकारल्या, पण, बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यास स्वीकारणार असल्याचं रिना सांगतात. लहानपणापासून त्यांना फिटनेस आवडतो. सुदंर दिसणाऱ्या रिना यांना 13 वर्षाचा मुलगा आहे. रिना या सलमान खानच्या खूप मोठ्या फॅन आहेत.

VIDEO : 'अब हवा करेगी रोशनी का फैसला..' मुख्यमंत्र्यांची अशीही शेरोशायरी

First published: September 13, 2019, 4:59 PM IST
Tags: child

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading