• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • गौतम गंभीरनं केली रवी शास्त्रींवर टीका, टीम इंडियावरील वक्तव्याबाबत साधला निशाणा

गौतम गंभीरनं केली रवी शास्त्रींवर टीका, टीम इंडियावरील वक्तव्याबाबत साधला निशाणा

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने रवी शास्त्रींवर (Ravi Shastri) टीका केली आहे. गंभीरनं शास्त्रींवर टीम इंडियाबाबत केलेल्या वक्तव्यावरून निशाणा साधला आहे.

 • Share this:
  मुंबई, 22 नोव्हेंबर: टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ आता संपला आहे. माजी कॅप्टन राहुल द्रविडनं (Rahul Dravid) त्यांची जागा घेतली आहे. द्रविडच्या कारकिर्दीमधील पहिल्याच सीरिजमध्ये टीम इंडियानं  न्यूझीलंडचा 3-0 असा पराभव केला आहे. या कामगिरीनंतर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने रवी शास्त्रींवर टीका केली आहे. गंभीरनं शास्त्रींवर टीम इंडियाबाबत केलेल्या वक्तव्यावरून निशाणा साधला आहे. गंभीरला शास्त्रींच्या कार्यकाळाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यानं शास्त्रींना टीम इंडियाबाबत केलेल्या स्तूतीपर वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. टीम इंडियानं ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकल्यानंतर शास्त्रींनी त्याची तुलना 1983 साली जिंकलेल्या वर्ल्ड कपशी केली होती. गंभीरनं 'टाईम्स नाऊ नवभारत'शी बोलताना या विषयावर मत व्यक्त केलं आहे.  'मला ती गोष्ट आश्चर्यकारक वाटली होती. तुम्ही चांगलं खेळता तेव्हा त्याबाबत कधीही शेखी मिरवत नाही. अन्य कुणी प्रशंसा केली तर ठीक आहे. आम्ही 2011 साली वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळी आम्ही कुणीही ही जगातील बेस्ट टीम असल्याचं वक्तव्य केलं नव्हतं. ऑस्ट्रेलियात जिंकणे ही नक्कीच मोठी गोष्ट आहे. इंग्लंडमध्ये जिंकले त्यावेळी देखील तुम्ही चांगली कामगिरी केली यामध्ये कोणतीही शंका नाही. पण दुसऱ्यांना तुमची प्रशंसा करू द्या. तुम्ही या प्रकारचे वक्तव्य राहुल द्रविडकडून कधीही ऐकणार नाही. भारतीय टीम चांगली खेळो अथवा वाईट त्याची प्रतिक्रिया नेहमीच संतुलित असेल.' असा शास्त्री आणि द्रविडमधील फरक गंभीरनं यावेळी स्पष्ट केला. VIDEO: बाबर आझमची कमाई किती? पाकिस्तानच्या कॅप्टनचं उत्तर ऐकूण आवरणार नाही हसू रवी शास्त्रींच्या कार्यकाळात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियामध्ये दोन वेळा टेस्ट सीरिज जिंकली. तसंच इंग्लंड विरुद्ध नुकत्यात झालेल्या टेस्ट सीरिजमध्येही टीम इंडिया 2-1 नं आघाडीवर आहे. मात्र त्यांच्या कार्यकाळात आयसीसी स्पर्धा जिंकण्यात टीम इंडियाला यश मिळाले नाही.
  Published by:News18 Desk
  First published: