मुंबई, 22 नोव्हेंबर :पाकिस्तानची क्रिकेट टीम (Pakistan Cricket Team) सध्या भरपूर व्यस्त आहे. टी 20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) लगेच ही टीम बांगलादेशच्या दौऱ्यावर रवाना झाली. या टीमनं वर्ल्डमध्ये सुपर 12 मधील सर्व मॅच जिंकत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता. तिथं ऑस्ट्रेलियानं त्यांचा पराभव केला. त्यानंतर आता बांगलादेश विरुद्धच्या टी20 मालिकेत (Bangladesh vs Pakistan T20) 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
बांगलादेश दौऱ्यावरील पाकिस्तान टीमचा कॅप्टन बाबर आझमनं (Babar Azam) एका सत्रामध्ये त्याच्याबाबत सर्वात जास्त गूगल केल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं दिली. यामध्ये एक प्रश्न बाबर आझम किती कमाई करतो? हा देखील होता. त्यावर बाबर म्हणाला की, 'मी याचं उत्तर सांगणार नाही. पण तुम्ही जितका विचार करता त्यापेक्षा कमीच आहे.' बाबरचं हे उत्तर सध्या सोशल मीडियावर चांगलंच गाजत आहे.
Let's hear @babarazam258 answer the most googled questions about him.#BANvPAK #HarHaalMainCricket pic.twitter.com/5xr7ZH8ghi
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 21, 2021
बाबर आझमला पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) ए ग्रेड वेतन दिलं आहे. जे अन्य खेळाडूंपेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर तो पाकिस्तान सुपर लीगमध्येही (PSL) खेळतो. त्यामुळे तो सर्वाधिक कमाई करणारा पाकिस्तानचा क्रिकेटपटू आहे. अंडर-19 टीममध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या बाबरनं सिनिअर क्रिकेटमध्येही ठसा उमटवला असून सध्या तो पाकिस्तानच्या तीन्ही प्रकारातील आंतरराष्ट्रीय टीमचा कॅप्टन आहे.
सानिया मिर्झाच्या मुलाची तब्येत बिघडली, शोएब मलिक बांगलादेशहून तातडीनं दुबईला रवाना
बाबर आझमनं 35 टेस्टमध्ये 2362 रन केले आहेत. तर 83 वन-डेमध्ये 3985 रन केले आहे. 69 टी20 इंटरनॅशनलमध्ये त्याच्या नावावर 2515 रन आहेत. बाबर टी20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक रन करणारा पाकिस्तानी आहे. त्याचबरोबर त्यानं टेस्टमध्ये 5, वन-डे मध्ये 14 आणि टी20 इंटरनॅशनलमध्ये 1 शतक झळकावलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Babar azam, Cricket news, Pakistan