मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गॅस भरण्यासाठी माहेरून पैसे न आणल्याने पत्नीची निर्घृण हत्या; विळ्याने सपासप वार करत विटांनी ठेचलं

गॅस भरण्यासाठी माहेरून पैसे न आणल्याने पत्नीची निर्घृण हत्या; विळ्याने सपासप वार करत विटांनी ठेचलं

Murder in Osmanabad: उस्मानाबादेत एका तरुणाने आपल्या 20 वर्षीय पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. आरोपीनं पीडितेच्या गळ्यावर विळी आणि कोयत्याने सपासप वार केले आहेत.

Murder in Osmanabad: उस्मानाबादेत एका तरुणाने आपल्या 20 वर्षीय पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. आरोपीनं पीडितेच्या गळ्यावर विळी आणि कोयत्याने सपासप वार केले आहेत.

Murder in Osmanabad: उस्मानाबादेत एका तरुणाने आपल्या 20 वर्षीय पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. आरोपीनं पीडितेच्या गळ्यावर विळी आणि कोयत्याने सपासप वार केले आहेत.

  • Published by:  News18 Desk
उस्मानाबाद, 22 ऑक्टोबर: उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील शिराढोण येथील हत्येची एक थरारक घटना समोर आली आहे. येथील एका 20 वर्षीय विवाहित महिलेची तिच्या पतीने निर्घृण हत्या (Wife's brutal murder by husband) केली आहे. आरोपीनं विवाहितेच्या गळ्यावर विळी आणि कोयत्याने सपासप वार (Attack with scythe) केले आहेत. तसेच तिला विटांनी मारहाण केली आहे. हा हल्ला इतका भयंकर होता, की संबंधित महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव आरोपी पतीला अटक (Accused husband arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. काजल मारूती माने असं हत्या झालेल्या वीस वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे. ती उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील शिराढोण येथील रहिवासी आहे. तर कृष्णा वायलेराम जाधव असं अटक केलेल्या आरोपी पतीचं नाव असून तो जालना जिल्ह्यातील मांजरगावचा रहिवासी आहे. मृत काजल हिचं एक वर्षांपूर्वी आरोपी कृष्णासोबत विवाह झाला होता. काजलच्या वडिलांचं 12 वर्षांपूर्वी निधन झालं होतं. त्यामुळे तिच्या आईनेच पै-पै बचत करून मुलीच्या लग्नाचा सर्व खर्च भागवला होता. हेही वाचा-महिलेनं पतीसोबतची खासगी चॅट केली इन्स्टाग्रामवर शेअर; कोर्टाने सुनावली ही शिक्षा दरम्यान, एक महिन्यापूर्वी मृत काजल आपल्या माहेरी शिराढोण येथे काही दिवस राहण्यासाठी गेली होती. बुधवारी आरोपी पती तिला घेऊन जाण्यासाठी आला होता. यादिवशी काजलला पायातील जोडवे करायचे असल्याने काजलची आई, काजल आणि जावई तिघेही बाजारपेठेत गेले. जोडवी खरेदी केल्यानंतर काजल आणि तिचा पती कृष्णा दोघंही घरी आले. तर काजलची आई थोडी उशिराने घरी पोहोचली. हेही वाचा-प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीला दिला रोज थोडा-थोडा मृत्यू;पत्नीचा कांड वाचून हादराल बाजारातून थकून आल्यानंतर काजलची आई घराबाहेरच बसली आणि शेजारच्या एका लहान मुलीला काजलला बोलावून आणण्यास सांगितलं. संबंधित मुलगी काजलला बोलावण्यासाठी घरात गेली असता, आतलं चित्र पाहून ओरडत बाहेर आली. मुलगी एवढी का घाबरली म्हणून काजलची आई आणि शेजारच्या एक महिलेनं घरात धाव घेतली. आतमध्ये काजल रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या गळ्यावर विळी आणि कोयत्याने वार करण्यात आले होते. काजलच्या आईने आरडाओरड केल्यानंतर शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला पकडलं. हेही वाचा-मित्रानेच दिला दगा; पुण्यात तरुणीला ज्यूसमधून गुंगीचं औषध देत घृणास्पद कृत्य मृत काजलच्या आईनं दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी पती हा काजलकडे गॅस, किराणा भरण्यासाठी काही पैसे मागत होता. पण काजलची घरची परिस्थिती हलाकीची असल्याने तिच्याकडे पैसे नसल्याचं काजलने सांगितलं होतं. यातूनच दोघां पती-पत्नीत वाद झाला होता. यानंतर संतापलेल्या पतीने काजलची निर्घृण हत्या केली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
First published:

Tags: Crime news, Murder

पुढील बातम्या