• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • महिलेनं पतीसोबतची खासगी चॅट केली इन्स्टाग्रामवर शेअर; कोर्टाने सुनावली ही शिक्षा

महिलेनं पतीसोबतची खासगी चॅट केली इन्स्टाग्रामवर शेअर; कोर्टाने सुनावली ही शिक्षा

पोलीस तपासात असं समोर आलं, की महिलेची जानेवरीमध्ये आपल्या पतीसोबत अखेरची चॅटिंग झाली होती. याच चॅटचे फोटो तिनं इन्स्टाग्रामवर अपलोड केले होते.

 • Share this:
  दुबई 22 ऑक्टोबर : दुबईतील एका कोर्टाने एका ४० वर्षीय महिलेला 41 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. महिलेला पतीच्या प्रायव्हसीसोबत छेडछाड (Invasion of Husband's Privacy) केल्याच्या आरोपात दोषी ठरवण्यात आलं आहे. महिलेनं आपल्या पतीचा फोन नंबर आणि फोटो इन्स्टाग्रामवर (Photos on Instagram) शेअर केले होते. यानंतर प्रकरण थेट न्यायालयात पोहोचलं. प्रेयसीला अधिकारी बनवण्यासाठी हा झाला चोर; ऑफिसातून तब्बल 1.75 कोटी लंपास पोलीस तपासात असं समोर आलं, की महिलेची जानेवरीमध्ये आपल्या पतीसोबत अखेरची चॅटिंग झाली होती. याच चॅटचे फोटो तिनं इन्स्टाग्रामवर अपलोड केले होते. यानंतर पीडित पतीनं दुबईच्या बर येथील पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली (Husband Filed Complaint Against Wife) आणि महिलेविरोधात गुन्हा दाखल केला. कोर्टात पतीनं असा आरोप केला पत्नीच्या या कृत्यामुळे त्याची प्रायव्हरी भंग झाली आहे. मात्र, पत्नीनं न्यायालयातच आपल्यावर लावण्यात आलेले हे आरोप नाकारले. महिलेनं आपल्या बचावात असं सांगितलं, की ती आपल्या फ्लॅटमध्ये होती आणि फोनवर एका अॅपच्या माध्यमातून ती आपल्या पतीच्या बहिणींसोबत घटस्फोटाबद्दल बोलत होती. महिला आणि तिच्या पतीची घटस्फोटासाठीही केस सुरू आहे. प्रेयसीला अधिकारी बनवण्यासाठी हा झाला चोर; ऑफिसातून तब्बल 1.75 कोटी लंपास नंतर मात्र पत्नीने कोर्टासमोर मान्य केलं की तिनं इन्स्टाग्रामवर आपल्या मुलांचे फोटो आणि आपल्या पतीसोबत झालेली चॅट शेअर केली होती. पत्नीनं म्हटलं की तिला याबाबत काहीही कल्पना नव्हती की इतकी लहान गोष्ट कोर्टापर्यंत पोहोचेल. या प्रकरणाच्या चौकशीनंतर कोर्टाने आदेश देत पत्नीला 41 हजार रुपयांचा दंड ठोठावला. पतीच्या वकिलांनी महिलेविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.
  Published by:Kiran Pharate
  First published: