मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीला दररोज थोडा-थोडा दिला मृत्यू; पत्नीने केलेला कांड वाचून हादराल

प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीला दररोज थोडा-थोडा दिला मृत्यू; पत्नीने केलेला कांड वाचून हादराल

Murder in Yavatmal: यवतमाळमधील एका महिलेनं अनैतिक संबंधात (Murder in immoral relationship) अडथळा ठरणाऱ्या आपल्या पतीला भयंकर मृत्यू दिला आहे.

Murder in Yavatmal: यवतमाळमधील एका महिलेनं अनैतिक संबंधात (Murder in immoral relationship) अडथळा ठरणाऱ्या आपल्या पतीला भयंकर मृत्यू दिला आहे.

Murder in Yavatmal: यवतमाळमधील एका महिलेनं अनैतिक संबंधात (Murder in immoral relationship) अडथळा ठरणाऱ्या आपल्या पतीला भयंकर मृत्यू दिला आहे.

  • Published by:  News18 Desk
यवतमाळ, 22 ऑक्टोबर: यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी जवळील सावळेश्वर येथे नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका महिलेनं अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या आपल्या पतीला भयंकर मृत्यू (Murder in immoral relationship) दिला आहे. आरोपी महिलेनं आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीला दररोज थोड्या थोड्या प्रमाणात दारू आणि अन्न-पाण्यातून कीटकनाशकांची मात्रा (give dosage of pesticides) दिली आहे. गेली अनेक दिवसांपासून कीटकनाशकं देऊनही पती जिवंत असल्याची पाहून पत्नीने गळा आवळून आपल्या पतीची हत्या (Wife killed husband with help of lover) केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. या घटनेचा  पुढील तपास पोलीस करत आहे. भीमराव काळबांडे असं हत्या झालेल्या पतीचं नाव आहे. मृत भीमराव गेल्या एक ते दीड वर्षांपासून आपल्या पत्नीसह सावळेश्वर येथे वास्तव्याला होता. दरम्यान भीमरावच्या पत्नीचं त्याच्याच नात्यातील अनिरुद्ध काळबांडे याच्यासोबत अनैतिक संबंध जुळून आले होते. दोघांत गेल्या काही काळापासून दोघांत अनैतिक संबंध सुरू होते. पण सहा महिन्यांपूर्वी मृत भीमरावला पत्नीच्या अनैतिक संबंधाची कुणकुण लागली, त्यामुळे दोघांत सतत वाद होऊ लागला. हेही वाचा-होमवर्क न केल्याने तालिबानी शिक्षा;टीचरने जमिनीवर आपटून विद्यार्थ्याचा घेतला जीव या वादातून मृत भीमराव याने आपल्या पत्नीला काही दिवसांसाठी माहेरी पाठवले. पण नातेवाईकांनी मध्यस्थी करत दोघांमध्ये समेट घडवून आणला. पण यानंतर भीमरावच्या पत्नीचे प्रेमसंबंध सुरूच होते. यामुळे प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या भीमरावची हत्या करण्याचा कट आरोपी पत्नीनं आणि तिच्या प्रियकराने रचला. त्या कटानुसार आरोपी पत्नीनं दारूचं व्यसन असणाऱ्या भीमरावला दारू, पिण्याचं पाणी आणि अन्नातून दररोज कीटकनाशकांची मात्रा देण्यास सुरुवात केली. हेही वाचा-पतीने आवडीचा शर्ट न शिवल्याने दुखावली अन्...; पत्नीने आयुष्याचा केला भयावह शेवट काही दिवसांतच भीमराव याची प्रकृती बिघडू लागली. यामुळे भीमरावच्या भावाने त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. पण भीमराव रुग्णालयात दाखल झाला, तर आपला कांड उघडकीस येईल, या भितीतून आरोपी पत्नीने घटनेच्या दिवशी भीमरावला जास्त प्रमाणात कीटकनाशकांची मात्रा दिली. तरीही भीमरावचा मृत्यू झाला नाही. यामुळे पत्नीने आणि तिच्या प्रियकराने शेवटी भीमरावची गळा आवळून हत्या केली आहे. आरोपी महिलेनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
First published:

Tags: Murder, Yavatmal

पुढील बातम्या