मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मित्रानेच दिला दगा; पुण्यात तरुणीला ज्यूसमधून गुंगीचं औषध देत घृणास्पद कृत्य

मित्रानेच दिला दगा; पुण्यात तरुणीला ज्यूसमधून गुंगीचं औषध देत घृणास्पद कृत्य

Rape in Pune: पुण्यातील एका तरुणाने आपल्या मैत्रिणीला ज्यूसमधून गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार (female friend rape by giving numbing drugs through juice) केला आहे.

  • Published by:  News18 Desk
पुणे, 22 ऑक्टोबर: पुण्यातील एका तरुणाने आपल्या मैत्रिणीला ज्यूसमधून गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार (female friend rape by giving numbing drugs through juice) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नराधम आरोपीनं पीडित तरुणीला गोड बोलून आपल्या फ्लॅटवर गेला होता. याठिकाणी आरोपीनं ज्यूसमधून पीडितेला गुंगीचं औषध दिलं होतं. यानंतर गुंगी आलेल्या युवतीवर आरोपीनं बलात्कार केला. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने बलात्कार करतानाचा व्हिडीओ देखील शूट (Shoot obscene videos) केला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. अक्षय कदम असं गुन्हा दाखल झालेल्य आरोपी तरुणाचं नाव असून तो पुण्यातील आंबेगाव परिसरातील रहिवासी आहे. तर पीडित तरुणी ही आरोपी अक्षयच्या ओळखीची आहे. 31 जुलै रोजी आरोपी तरुण पीडित तरुणीला आपल्या फ्लॅटवर घेऊन गेला होता. याठिकाणी आरोपीने पीडितेला गुंगीचं औषध टाकलेला ज्यूस प्यायला दिलं होतं. ज्यूस प्यायल्यानंतर काही वेळातच पीडित तरुणीला गुंगी आली. हेही वाचा- प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीला दररोज थोडा-थोडा दिला मृत्यू; पत्नीने केलेला कांड वाचून हादराल यानंतर आरोपीनं मैत्रीच्या नात्याला कलंक फासत पीडित तरुणीवर बलात्कार केला आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने बलात्कार करतानाचा व्हिडीओ देखील बनवला आहे. यानंतर आरोपीनं पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवत आणि संबंधित अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अनेकदा अत्याचार केला आहे. शेवटी पीडित तरुणीने आरोपीकडे लग्नाची मागणी केली. पण आरोपीनं लग्न करण्यास नकार दिला. हेही वाचा-धक्कादायक! तरुणाने काकीसोबत केलं असं काही आईने विहिरीत उडी मारून केली आत्महत्या आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर, पीडित तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह ब्लॅकमेलिंगच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.
First published:

Tags: Crime news, Pune, Rape

पुढील बातम्या