मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सांगली: 10 वर्षांचा संसार क्षणात मोडला; प्रेमात आंधळ्या झालेल्या महिलेनं पतीचा घेतला जीव

सांगली: 10 वर्षांचा संसार क्षणात मोडला; प्रेमात आंधळ्या झालेल्या महिलेनं पतीचा घेतला जीव

Murder in Sangli: सांगली जिल्ह्यातील आटपाडी याठिकाणी एका महिलेनं अनैतिक संबंधातून (Immoral relationship) आपल्या पतीची निर्घृण हत्या (Husband's brutal murder) केली आहे.

Murder in Sangli: सांगली जिल्ह्यातील आटपाडी याठिकाणी एका महिलेनं अनैतिक संबंधातून (Immoral relationship) आपल्या पतीची निर्घृण हत्या (Husband's brutal murder) केली आहे.

Murder in Sangli: सांगली जिल्ह्यातील आटपाडी याठिकाणी एका महिलेनं अनैतिक संबंधातून (Immoral relationship) आपल्या पतीची निर्घृण हत्या (Husband's brutal murder) केली आहे.

  • Published by:  News18 Desk

आटपाडी, 29 डिसेंबर: सांगली (Sangli) जिल्ह्यातील आटपाडी याठिकाणी एका महिलेनं अनैतिक संबंधातून (Immoral relationship) आपल्या पतीची निर्घृण हत्या (Husband's brutal murder) केली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी पत्नीनं आपला भाऊ, बहीण आणि भावोजींच्या मदतीनं नवऱ्याने आत्महत्या केल्याचं भासवण्याचा (Murdered and plot as suicide) प्रयत्न केला आहे. पण त्यांचा हा बनाव फार काळ टिकला नाही. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी पत्नीसह चारही जणांना अटक (4 arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

सतीश उत्तम धुमाळ असं हत्या झालेल्यया 31 वर्षीय पतीचं नाव आहे. तर पत्नी चंदा, मेहुणा चेतन बलभीम वाडेकर, साडू अतुल पवार आणि मेहुणी मोनिका पवार असं अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावं आहे. चारही आरोपी आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील रहिवासी आहे. मृत सतीश हा देखील गेल्या दहा वर्षांपासून आपल्या पत्नीसह सासुरवाडीत नातेवाईकांच्या घरी भाड्याने राहत होता. सोमवारी रात्री संबंधित चार जणांनी धारदार शस्त्राने वार करून सतीशचा खून केला आहे.

हेही वाचा-मूल होत नसल्याने सुनेसोबत सासऱ्याचं विकृत कृत्य; माणुसकीला हादरवणारी घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सतीश याचं मूळगाव सातारा जिल्ह्यातील म्हसवड असून तो गेल्या दहा वर्षांपासून आपल्या पत्नीसह सासुरवाडी खरसुंडी येथे भाड्याच्या घरात राहत होता. आचारी काम, रंगकाम अशी मिळेल ती कामं करत तो आपला उदरनिर्वाह चालवत होता. त्याला दारूचं व्यसन देखील होतं. दिवसभर काम केल्यानंतर अनेकदा तो दारुच्या धुंदीत असायचा. याचाच फायदा घेत गेल्या काही दिवसांपासून पत्नी चंदाचे गावातील अन्य एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध जुळले होते.

हेही वाचा-8 दिवसांनी चिमुकलीचा सापडला मृतदेह, अंगाला चिटकलेल्या गव्हाने उलगडलं खुनाचं गूढ

सतीश हा दोघांच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरत होता. त्यामुळे पत्नी चंदा हिने सतीशचा अडसर कायमचा दूर करण्याचं ठरवलं. यातूनच तिने आपला भाऊ, बहीण आणि भावोजी यांच्या मदतीने पतीची हत्या करण्याचा कट रचला. त्यानुसार सोमवारी रात्री आरोपींनी धारदार शस्त्राने सतीशवर वार करून त्याची हत्या केली. यानंतर आरोपींनी सतीशने आत्महत्या केली असल्याचा बनाव रचला. पण त्यांचा हा बनाव फार काळ टिकला नाही. तपासाअंती पोलिसांनी चारही जणांना अटक केली आहे. आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Murder, Sangli