मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पंढरपूर: मूल होत नसल्याने सुनेसोबत सासऱ्याचं विकृत कृत्य; माणुसकीला हादरवणारी घटना

पंढरपूर: मूल होत नसल्याने सुनेसोबत सासऱ्याचं विकृत कृत्य; माणुसकीला हादरवणारी घटना

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Crime in Solapur: पंढरपुरात नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका व्यक्तीने आपल्या सुनेला मूल होत नाही, म्हणून तिच्यासोबत विकृतीचा कळस गाठला आहे.

पंढरपूर, 28 डिसेंबर: सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या पंढरपूर (Pandharpur) याठिकाणी नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका व्यक्तीने आपल्या सुनेला मूल होत नाही, म्हणून तिच्यासोबत विकृतीचा कळस गाठला आहे. आरोपी सासऱ्याने पीडित महिलेचे आंघोळ करतानाचे अश्लील व्हिडीओ शूट (Shoot obscene videos while taking bath) करून तिच्याकडे शरीर संबंधाची मागणी (Demand sexual relation at daughter in law) केली आहे. गेल्या काही दिवसांपासून आरोपी सासरा पीडित महिलेवर शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकत होता. अखेर आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी विनयभंगासह धमकी आणि ब्लॅकमेलिंग अशा कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेची गांभीर्यता लक्षात घेत, पोलिसांनी तातडीने आरोपी सासऱ्याला अटक (Accused father in law arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पंढरपूर पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ दिवसांपूर्वी पीडित महिला घरी एकटी असताना, सासऱ्याने तिच्या अंगावर हात टाकून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा-महिलेच्या पायांना स्पर्श करणं हाही विनयभंगच, मुंबई HC चा महत्त्वपूर्ण निकाल

सासऱ्याकडून होणारी बळजबरी पाहून पीडित महिलेनं आरडाओरडा केला, त्यामुळे घाबरलेल्या सासऱ्याने तिला सोडलं. पीडित महिलेनं हा प्रकार तिच्या पतीला सांगितला असता, त्यानं पीडितेची समजूत काढली. पण आरोपी सासऱ्याची खोड काही मोडली नाही. आरोपी सासऱ्याने पीडित महिलेचा अंघोळ करतानाचा अश्लील व्हिडीओ शूट केला आहे. संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत, आरोपीनं पुन्हा एकदा पीडित महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी केली आहे.

हेही वाचा-ख्रिसमससाठी GFला भेटायला गेला अन् जाळ्यात अडकला; गावकऱ्यांचं कृत्य वाचून हादराल

तुला माझ्या मुलापासून मुल होणार नाही, तू माझ्याशी संबंध ठेव असं म्हणत आरोपीनं पीडितेवर दबाव टाकायला सुरुवात केली. अखेर आरोपी सासऱ्याच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं सर्व प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला आहे. यानंतर पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी पंढरपूर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी सासऱ्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी सासऱ्याला ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Solapur