मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /भयंकर! 8 दिवसांनी चिमुकलीचा सापडला मृतदेह, अंगाला चिटकलेल्या गव्हाने उलगडलं खुनाचं गूढ

भयंकर! 8 दिवसांनी चिमुकलीचा सापडला मृतदेह, अंगाला चिटकलेल्या गव्हाने उलगडलं खुनाचं गूढ

Murder in Yavatmal: यवतमाळ जिल्ह्याच्या कुऱ्हा दुमणी येथे एका 3 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिची हत्या (Minor girl kidnap and murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Murder in Yavatmal: यवतमाळ जिल्ह्याच्या कुऱ्हा दुमणी येथे एका 3 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिची हत्या (Minor girl kidnap and murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Murder in Yavatmal: यवतमाळ जिल्ह्याच्या कुऱ्हा दुमणी येथे एका 3 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिची हत्या (Minor girl kidnap and murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

यवतमाळ, 28 डिसेंबर: यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या कुऱ्हा दुमणी येथे एका 3 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिची हत्या (Minor girl kidnap and murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेल्या आठ दिवसांपासून सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर चिमुकलीचा मृतदेह आढळला आहे. मृत मुलीच्या अंगाला चिटकलेल्या गव्हाच्या दाण्यांमुळे या खुनाचं गूढ उलगडलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत मुलीच्या काकूला बेड्या (Accused aunty arrested) ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मानवी अविनाश चोले असं हत्या झालेल्या 3 वर्षीय चिमुकलीचं नाव आहे. 20 डिसेंबर रोजी मानवी आपल्या घरासमोर खेळत होती. खेळत असताना ती अचानक गायब झाली. त्यामुळे मानवीची आई पूजा आणि वडील अविनाश यांनी मानवीचा सर्वत्र शोध घेतला. पण ती काही सापडली नाही. अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन मुलगी बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल केली. पोलिसांनी घटनेची गांभीर्यता लक्षात घेत, अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि तपासाला सुरुवात केली.

त्यासाठी कुऱ्हा गावात श्वान पथकही दाखल झालं. वन विभागाच्या कर्मचाऱ्याच्या मदतीने श्वान पथकाने जंगल आणि लगतच्या भागात चिमुकलीचा शोध घेतला. पण तिचाही काहीही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे पोलिसांनी मुलीच्या शोधासाठी गावातच मुक्काम ठोकला. गेल्या सात दिवसांपासून शोधाशोध करूनही पोलिसांच्या हाती काहीही लागलं नाही। पोलिसांप्रमाणेच गावातील नागरिकही चिमुकल्या मानवीचा शोध घेत होते. अखेर 8 दिवसानंतर रविवारी रात्री मानवीचा मृतदेह घराजवळील स्नानगृहजवळ आढळून आला. मृतदेहला गहू चिटकले होते. यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ यांनी तपासाची चक्र फिरवली.

हेही वाचा-हत्या प्रकरणाचा 16 महिन्यांनी उलगडा; धक्कादायक माहिती आली समोर, पोलिसही चक्रावले

स्नानगृहाबाहेर सांडलेल्या गव्हावरून तपास करत पोलिसांनी मृत मुलीच्या चुलत काकुला गजाआड केलं आहे. पोलिसांनी मानवीची काकू पुष्पा गोपाल चोले हिला ताब्यात घेत, चौकशी केली असता तिने मानवीचा गळा दाबून खून केल्याचं तर कधी पाण्याच्या टाकीत बुडवून मारल्याचं सांगितलं आहे. तिने मानवीची हत्या कोणत्या कारणातून केली, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. आरोपी महिलेनं मानवीची हत्या करून तिचा मृतदेह गव्हाच्या कोठीत लपवून ठेवला होता. पण सहाव्या दिवशी मृतदेहाची दुर्गंधी सुटल्यानंतर महिलेनं मृतदेह घराबाहेर आणून टाकला आहे. यावेळी मृतदेहाला चिटकलेल्या गव्हाच्या दाण्यांमुळे खुनाचं गूढ उलगडलं आहे.

हेही वाचा-लग्नाच्या वाढदिवसाचा आनंद क्षणात विरला; विचित्र घटनेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू

पण मानवी ही आपल्या मुलापेक्षा हुशार आणि देखणी असल्याच्या कारणातून तिने ही हत्या केली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र हा नरबळीचाही प्रकार असल्याची कुजबुज परिसरात सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे 19 डिसेंबर रोजी पौर्णिमा होती. पौर्णिमा आणि अमावस्याच्या दिवसाला मांत्रिक लोकं खूप महत्त्व देतात. अशाच दिवशी नरबळीचे प्रकार घडतात. त्यामुळे या दृष्टीने देखील तपास होणं गरजेचं आहे, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Yavatmal