बीड, 13 सप्टेंबर: अनैतिक प्रेमसंबंधात (Immoral Relationship) अडसर ठरत असल्यानं आणि अनुकंपा तत्त्वावर मुलाला नोकरी लावण्यासाठी एका महिलेनं आपल्या पतीची फिल्मी स्टाइलनं हत्या (Wife killed husband) केली आहे. आरोपी महिलेनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं हा हत्येचा थरार घडवला आहे. त्यानंतर आरोपींनी आत्महत्या केल्याचा (Plot as suicide) बनाव रचला होता. याप्रकरणी स्थानिक पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद देखील करण्यात आली होती. पण घटनेच्या तीन महिन्यानंतर आरोपी महिलेचं बिंग फुटलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
भीमराव रंगनाथ खराटे असं हत्या झालेल्या 52 वर्षीय व्यक्तीचं नाव असून ते कळंब तालुक्यातील भोगजी येथील रहिवासी होते. मृत खराटे हे एसटी महामंडळात चालक पदावर कार्यरत होते. दरम्यान 29 मे 2021 रोजी केज तालुक्यातील मांगवडगाव शिवारातील धनराज थोरात यांच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळला. मृताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाइकांकडे दिला होता. तसेच युसूफवाडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.
हेही वाचा- मुंबई पुन्हा हादरली! जावयानं दगडाने सासूचं गुप्तांग ठेचून केली हत्या
पण मृत भीमराव खराटे यांचा भाऊल बालाजी खराटे यांना पत्नी, तिचा प्रियकर आणि मुलावर संशय होता. याप्रकरणी बालाजी यांनी युसूफवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. पण बालाजी यांनी हार मानली नाही. त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यानंतर न्यायालयानं संबंधित आरोपींवर युसूफवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
हेही वाचा-मुलांना मारण्यासाठी चॉपर आणला अन् स्वत:च ठरला बळी; तेच हत्यार खूपसून बापाचा खून
याप्रकरणी पोलिसांनी मयत भीमराव यांची पत्नी राधाबाई भीमराव खराटे (48), प्रियकर महादेव ऊर्फ बबन अच्युत खराटे (40) व मुलगा सिद्धेश्वर भीमराव खराटे (28) यांच्याविरुध्द युसूफवडगाव ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपी राधाबाई आणि महादेव यांच्यात मागील काही दिवसांपासून प्रेमसंबंध सुरू होते. पती भीमराव हा त्यांच्या प्रेमात अडथळा ठरत होता.
हेही वाचा-निर्दयी पतीकडून नवविवाहितेला बेल्टने अमानुष मारहाण;खुनाच्या घटनेनं नांदेड हादरलं
शिवाय भीमरावची हत्या केल्यास एसटी महामंडळातील सेवा कालावधीचे पैसे मिळतील आणि त्यांच्या जागी मुलगा सिध्देश्वर याला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळेल. अशी योजना आखून आरोपींनी थंड डोक्यानं भीमराव यांची हत्या केली आहे. राधाबाई आणि महादेवनं रचलेल्या या कटात आरोपींनी सिद्धेश्वरलाही सामावून घेतलं होतं. संबंधित तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याचा तपास करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Crime news, Murder