नांदेड, 13 सप्टेंबर: घटस्फोटीत पतीनं आपल्या नवविवाहित पत्नीला बेल्टने अमानुष मारहाण (Beating with belt) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही मारहाण इतकी भयंकर होती, की यामध्ये पीडित महिलेचा जागीच मृत्यू (Wife death after beating) झाला आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी पतीसह आणखी एकाला अटक (2 Arrest) केली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. संबंधित घटना नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मरडगा येथील आहे. तर संजय दत्तराव काळे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो हदगाव तालुक्यातील मरडगा येथील रहिवासी आहे. आरोपी काळे हा घटस्फोटीत असून त्याचं काही महिन्यांपूर्वी कळमनुरी तालुक्यातील भोसी येथील सगुना नावाच्या युवतीशी लग्न झालं होतं. लग्नाच्या काही दिवसातच आरोपीनं पीडितेला नरक यातना द्यायला सुरुवात केली आहे. बेल्टनं अमानुष मारहाण करत आरोपीनं पाच महिन्यांतच आपल्या पत्नीची हत्या केली आहे. हेही वाचा- भयंकर! सुनेसोबत वाद; सूड उगवण्यासाठी आजीने 3 वर्षांच्या नातवालाच संपवल नेमकं प्रकरण काय आहे? आरोपी संजय दत्तराव काळे याचा पाच महिन्यांपूर्वी मृत सगुना हिच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवस आनंदात गेल्यानंतर आरोपी संजय हा सगुनावर चारित्र्यावरून संशय घेत तिला त्रास देऊ लागला. दरम्यान त्यानं चारित्र्याच्या संशयातून पीडितेला अनेकदा शिवीगाळ आणि मारहाण केली आहे. दरम्यान 11 सप्टेंबर रोजी आरोपीनं चारित्र्याच्या संशयातून सगुना यांना बेल्टनं अमानुष मारहाण केली आहे. ही मारहाण इतकी भयंकर होती, यात सगुना यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा- नाशिक हादरलं! दुचाकी अडवून महिलेला कारमध्ये टाकलं,बलात्कार करत काढले अश्लील फोटो पोलिसांनी पती संजय, दीर राजू, सासरा दत्तराव, सासू कौशल्या आणि जाऊ गोदावरी यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोप पती संजयसह राजूला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.