Home /News /mumbai /

मुंबई पुन्हा हादरली! जावयानं दगडाने सासूचं गुप्तांग ठेचून केली हत्या

मुंबई पुन्हा हादरली! जावयानं दगडाने सासूचं गुप्तांग ठेचून केली हत्या

मुंबईतील विले पार्ले परिसरात एका तरुणानं आपल्या सासूची भयंकर पद्धतीनं हत्या केली आहे.

मुंबईतील विले पार्ले परिसरात एका तरुणानं आपल्या सासूची भयंकर पद्धतीनं हत्या केली आहे.

Murder in Mumbai: मुंबईतील विले पार्ले परिसरात एका तरुणानं आपल्या सासूची भयंकर पद्धतीनं हत्या (son in law killed mother in law) केली आहे.

मुंबई, 13 सप्टेंबर: महाराष्ट्राची राजधानी मुंबईत (Mumbai) नेमकं काय सुरू आहे? असाच प्रश्न अनेकांना पडला आहे. मुंबईतील साकीनाका येथे एका तरुणीवर बलात्कार (Sakinaka Rape case) करून तिची निर्घृण हत्या (Brutal murder after rape) केल्याची घटना ताजी असताना, महिलेवर क्रूरतेचा कळस गाठणारी आणखी एक घटना समोर आली आहे. मुंबईतील विले पार्ले परिसरात एका जावयानं आपल्या सासूची भयंकर पद्धतीनं हत्या (son in law killed mother in law) केली आहे. या क्रूर घटनेनं पुन्हा एकदा राजधानी हादरली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून असून आरोपी जावयाला बेड्या (Accused arrested) ठोकल्या आहेत. नेमकी घटना काय आहे? हत्या करणारा आरोपी तरुण हा विलेपार्ले परीसरातील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी त्याला पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली अटक केली होती. या प्रकरणात तो 1 सप्टेंबर रोजी जामिनावर सुटून तुरुंगाबाहेर आला. दरम्यान त्याच्या पत्नीनं दुसरं लग्न केल्याचं त्याला समजलं. एवढच नव्हे तर त्याच्या पत्नी दुसऱ्या नवऱ्यापासून गरोदर आहे, हे कळल्यावर त्याचा पारा चढला. याच रागातून आरोपीनं थेट सासूचं घर गाठून तिची निर्घृण हत्या (Mother in law's brutal murder) केली आहे. हेही वाचा-नाशिक हादरलं! दुचाकी अडवून महिलेला कारमध्ये टाकलं,बलात्कार करत काढले अश्लील फोटो आरोपी जावई सासूच्या घरी गेला असता, त्याचं सासूसोबत जोरदार भांडण झालं. बायकोचं दुसरं लग्न लावून दिल्याच्या रागात आरोपीनं सासूला जबरी मारहाण केली. आरोपी जावई एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं दगड आणि चाकूनं सासूच्या गुप्तांगावर वार करत गुप्तांग दगडानं ठेचलं (crushed mother in laws genitals with stone) आहे. या माणुसकीला हादरवणाऱ्या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. हेही वाचा-निर्दयी पतीकडून नवविवाहितेला बेल्टने अमानुष मारहाण;खुनाच्या घटनेनं नांदेड हादरलं या घटनेची माहिती मिळताच विलेपार्ले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वपोलिसांनी जखमी महिलेला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण उपचार सुरू असताना पीडित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संबंधित आरोपी 1 सप्टेंबर रोजी जामिनावर सुटून बाहेर आला होता. यानंतर त्यानं 2 सप्टेंबर सासूची क्रूरतेनं मारहाण केली होती. यानंतर आता संबंधित जखमी महिलेनं रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे. या घटनेचा पुढील तपास विलेपार्ले पोलीस करत आहेत.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Crime news, Mumbai, Murder

पुढील बातम्या