Home /News /maharashtra /

मुलांना मारण्यासाठी चॉपर आणला अन् स्वत:च ठरला बळी; तेच हत्यार छातीत खूपसून लेकानं बापाला संपवलं

मुलांना मारण्यासाठी चॉपर आणला अन् स्वत:च ठरला बळी; तेच हत्यार छातीत खूपसून लेकानं बापाला संपवलं

जळगाव जिल्ह्यातील निमखेडी याठिकाणी एक हृदय हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका दोन तरुणांनी आपल्या जन्मदात्या वडिलांची निर्घृण हत्या (Son killed father) केली आहे.

    जळगाव, 13 सप्टेंबर: जळगाव जिल्ह्यातील निमखेडी याठिकाणी एक हृदय हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका दोन तरुणांनी आपल्या जन्मदात्या वडिलांची निर्घृण हत्या (Son killed father) केली आहे. वडिलानं आईवर भलताच संशय घेतल्यानं मुलानं जन्मदात्या पित्याची छातीत चॉपर खूपसून हत्या (Attack with chopper and murdered) केली आहे. संबंधित घटना रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास निमखेडी शिवारातील कांताई नेत्रालयाजवळ घडली. आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपी मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. प्रेमसिंग अभयसिंग राठोड असं मृत व्यक्तीचं नाव असून ते मुळचे मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. दरम्यान रविवारी सकाळी प्रेमसिंग राठोड यांनी आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला होता. त्यामुळे राठोड आणि त्यांची दोन मुलं यांच्यात वादाला सुरुवात झाली. यातूनच हा वाद वाढत गेला आणि याचं रुपांत्तर खुनात झालं आहे. हेही वाचा-नाशिक हादरलं! दुचाकी अडवून महिलेला कारमध्ये टाकलं,बलात्कार करत काढले अश्लील फोटो नेमकं काय घडलं? लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, प्रेमसिंग राठोड यांना कानाचा त्रास होता. त्यामुळे रविवारी त्यांना शहरातील दवाखान्यात जाऊन बऱ्हाणपूर येथे जाण्याबाबत मुलगा गोपाल आणि दीपक या दोघांनी आग्रह केला होता. पण प्रेमसिंग तिकडे जाण्यास तयार नव्हते. तिकडे जाण्याला विरोध करत प्रेमसिंग यांनी आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला. मी तिकडे गेलो तर पत्नी पाठीमागे दुसऱ्या लोकांच्या संपर्कात येते, असं बोलून त्यांन मुलांसमोर पत्नीचा अपमान केला. हेही वाचा-निर्दयी पतीकडून नवविवाहितेला बेल्टने अमानुष मारहाण;खुनाच्या घटनेनं नांदेड हादरलं आईच्या चारित्र्यावर संशय घेतल्यानं दोन्ही मुलं आणि वडील प्रेमसिंग यांच्यात वादाला सुरुवात झाली. हा वाद वाढत गेल्यानं दीपकनं रागाच्या भरात बापाला दांडक्यानं मारहाण केली. मुलानं मारहाण केल्यानं प्रेमसिंग यानं घरात लपवून ठेवलेला चॉपर मुलांवर हल्ला करण्यासाठी आणला. मृत प्रेमसिंग दोन्ही मुलांवर चॉपरनं हल्ला करणार तितक्यात गोपाल यानं वडिलांच्या हातातून हा  चॉपर हिसकावून घेतला आणि प्रेमसिंग यांच्या छातीवर, डोक्यावर आणि कमरेजवळ सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता, की प्रेमसिंग यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Jalgaon

    पुढील बातम्या