Home /News /maharashtra /

opposition leader : अजित पवार की जयंत पाटील विरोधी बाकासाठी कोणाची लागणार वर्णी?

opposition leader : अजित पवार की जयंत पाटील विरोधी बाकासाठी कोणाची लागणार वर्णी?

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी राजीनामा दिल्यामुळे मागच्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय सत्तानाट्यावर पडदा पडला आहे.

  मुंबई, 30 जून : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी राजीनामा दिल्यामुळे मागच्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय सत्तानाट्यावर पडदा पडला आहे. (Chief Minister Uddhav Thackeray resigns) मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याला कारणीभूत असलेले एकनाथ शिंदे (eknath shinde) सत्ता स्थापनेची तयारी करत आहेत. दरम्यान दुसरीकडे विधानसभा विरोधी पक्ष नेत्यांसाठी (Leader of the Opposition in the Assembly) आज एनसीपीची (ncp meeting) बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार (ajit pawar) किंवा जयंत पाटील (jayant patil) यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसपेक्षा (congress leader) जास्त आमदार असल्याने एनसीपीला (ncp) विरोधी पक्षनेते पद मिळणार असल्याचे चर्चा आहे.

  उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस सत्ता स्थापनेच्या तयारीला लागले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरी केलेल्या आमदारांना घेऊन देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन करणार आहेत. शिंदे यांच्यासह आमदार आज मुंबई येथे दाखल होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे रात्रीच गोव्यात दाखल झाले होते.

  हे ही वाचा : टायमिंगची चर्चा! बंडखोर बच्चू कडू यांना रस्ते गैरव्यवहार प्रकरणात क्लीन चिट; काय आहे प्रकरण?

  आपल्या बंडखोर आमदारांसह शिंदे ताज हॉटेलवर मुक्कामी आहेत. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे गट आता मवाळ झाला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांची ताज रेसिडेंसी हॅाटेलमथ्ये बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढील राजकीय रणनितीवर चर्चा होणार आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार आज मुंबईत परतण्याची शक्यता आहे.

  हे ही वाचा : उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर अखेर एकनाथ शिंदे आले पुढे, आता मुंबईत होणार दाखल

  एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार का?

  शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्यासोबत पक्षाचे निम्म्याहून अधिक आमदार सोबत आहेत. त्यामुळे भाजपसोबत सत्ता स्थापन करताना शिंदे गटाला काय मिळणार? याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे. यापूर्वी माध्यमात आलेल्या बातम्यांनुसार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदी असतील. शिंदे यांच्यासोबत प्रहार संघटनेचे दोन आमदारांसह काही अपक्ष आमदारही आहेत. त्यामुळे सत्तेचा वाटा कसा होणार? याबद्दल तर्तवितर्क लढवले जात आहेत.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Ajit pawar, Jayant patil, NCP, Oppose, Uddhav Thackeray (Politician)

  पुढील बातम्या