Home /News /mumbai /

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर अखेर एकनाथ शिंदे आले पुढे, आता मुंबईत होणार दाखल

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर अखेर एकनाथ शिंदे आले पुढे, आता मुंबईत होणार दाखल

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षाचे निम्म्याहून अधिक आमदार सोबत आहेत.

    मुंबई, 30 जून : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखेरीस राजीनामा दिल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर कायमच पडदा पडला आहे. उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आपल्या (Chief Minister Uddhav Thackeray resigns) राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याला कारणीभूत असलेले एकनाथ शिंदे अखेर आता समोर आले आहे. एकनाथ शिंदे आजच मुंबईत येणार आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे रात्रीच गोव्यात दाखल झाले होते. आपल्या बंडखोर आमदारांसह शिंदे ताज हॉटेलवर मुक्कामी आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे गट आता मवाळ झाला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांची आज सकाळी ९ वाजता ताज रेसिडेंसी हॅाटेलमथ्ये बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राजीनामा दिल्या नंतर पुढील राजकीय रणनितीवर चर्चा होणार आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार आज मुंबईत परतण्याची शक्यता आहे. दरम्यान,उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नव सरकारचा 1 जुलैला शपथविधी होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी ही माहिती दिली आहे. उद्या भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते 1 जुलैला शपथ घेण्याची शक्यता आहे. उद्या हंगामी अध्यक्षांची निवड होणार असल्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार का? शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षाचे निम्म्याहून अधिक आमदार सोबत आहेत. त्यामुळे भाजपसोबत सत्ता स्थापन करताना शिंदे गटाला काय मिळणार? याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे. यापूर्वी माध्यमात आलेल्या बातम्यांनुसार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदी असतील. शिंदे यांच्यासोबत प्रहार संघटनेचे दोन आमदारांसह काही अपक्ष आमदारही आहेत. त्यामुळे सत्तेचा वाटा कसा होणार? याबद्दल तर्तवितर्क लढवले जात आहेत.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या