पुण्या-मुंबईबाहेरच्या या शहराला घोषित केलं कोरोनाचं हॉटस्पॉट, अत्यावश्यक सेवाही बंद

प्रातिनिधिक फोटो

महाराष्ट्रातील मोठ्या शहरांपुरता मर्यादित असलेला कोरोनाचा संसर्ग आता ग्रामीण भागातही वाढत चालला आहे.

  • Share this:
    शिर्डी, 16 एप्रिल : महाराष्ट्रातील मोठ्या शहरांपुरता मर्यादित असलेला कोरोनाचा संसर्ग आता ग्रामीण भागातही वाढत चालला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा (Nevasa) शहरात 3  कोरोनाबाधित ( coronavirus) रुग्ण आढळल्याने शहर पाच दिवसांसाठी हॉटस्पॉट (Hotspot) केंद्र घोषित करण्यात आलं आहे. तसंच शहरातील अत्यावश्यक सेवाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. नेवासे शहरातील नागरिकांनी घराबाहेर न पडण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शहरातील रस्ते बंद केले गेले असून ड्रोनद्वारे करडी नजर ठेवली जात आहे. मात्र तरीही काही नागरिक घराबाहेर पडत असल्याने आता त्यांच्यावर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे. जे लोक विनाकारण बाहेर पडतील अशांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. एकीकडे, अहमदनगरमध्ये कोरोनाबधितांची संख्या वाढत असताना जिल्ह्यातील कोपरगाव येथील संजिवनी साखर कारखान्याने सॅनिटायझरची निर्मिती सुरू केली आहे. तालुक्यातील 45 हजार कुटुंबांना हे सॅनिटायझर मोफत दिले जात आहे. कोपरगाव येथील एका महिलेचा कोरोनाने तर एका महिलेचा सारीने मृत्यू झाल्याने विशेष काळजी घेतली जात आहे. वाचा - ...तर टीम इंडिया ऑस्ट्रेलियात 4 कोटी 20 लाख डॉलरच्या हॉटेलमध्ये होणार क्वारंटाइन संजीवनी उद्योग समूहाने हॅन्ड सॅनिटायझरची निर्मिती सुरू केली आहे. तालुक्यातील 60 हजार कुटुंबापैकी 45 हजार कुटुंबाला हे सॅनिटायजर मोफत दिले जात आहे. जगभर कोरोनाला हरवण्यासाठी असंख्य उपाययोजना होत असताना कोपरगावच्या संजिवनी साखर कारखानाही मागे नाह. गरजवंताना जेवण, अन्न धान्य त्याचबरोबर मास्कचे वाटप आणि आता सॅनिटायजरदेखील मोफत वाटप करत आहे, प्रत्येक घरातील माणूस सुरक्षित राहावा यासाठी हे करत असल्याचं संजिवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी म्हटलं आहे. अन्य बातम्या क्वारन्टाइन रुग्णांपासून नाही होणार कोरोना, नवी मुंबईचा पॅटर्न देशभर राबवणार एजाज खानच्या VIDEO मुळे सोशल मीडियावर खळबळ, अभिनेत्याच्या अटकेची होतेय मागणी
    First published: